AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anant Radhika 2nd Pre Wedding Celebration : अंबानीच्या पाहुण्यांनी क्रुझवर साऊथ इंडियन डिशवर मारला ताव

Anant Radhika 2nd Pre Wedding Celebration :अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जुलैमध्ये पार पडणार असल्याचे सांगितले जातंय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे दुसरे प्री वेडिंग फंक्शन हे सध्या जोरदार चर्चेत आहे.

Anant Radhika 2nd Pre Wedding Celebration : अंबानीच्या पाहुण्यांनी क्रुझवर साऊथ इंडियन डिशवर मारला ताव
Anant Ambani and Radhika Merchant
| Updated on: Jun 01, 2024 | 8:58 PM
Share

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनकडे सर्वांच्या नजरा आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न लंडन नव्हे तर भारतामध्येच होईल. 12 जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न मुंबईमध्ये होणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनचा आज शेवटचा दिवस आहे. या प्री वेडिंग फंक्शनला अत्यंत खास लोक सहभागी झालेत. हे दुसरे प्री वेडिंग फंक्शन अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे पहिले प्री वेडिंग फंक्शन गुजरातमधील जामनगर येथे झाले. गुजरातमधील प्री वेडिंग फंक्शनला देखील विदेशातून लोक सहभागी झाले होते.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे दुसरे प्री वेडिंग फंक्शन 29 मेपासून सुरू आहे. एका लक्झरी क्रूझवर हे सुरू आहे. आज या प्री वेडिंग फंक्शनचा शेवटचा दिवस आहे. हे क्रूझ इटलीवरून फ्रान्सला जातंय. अनेक व्हीव्हीआयपी पाहुणे क्रूझवर पार्टीसाठी पोहचले आहेत. हेच नाही तर या प्री वेडिंग फंक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. या पोस्टनुसार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये क्रूझवर पाहुण्यांसाठी साऊथ इंडियन पदार्थ खास ठेवण्यात आले. साऊथ इंडियन पदार्थांची मेजवाणी पाहुण्यांसाठी होती. मुळात म्हणजे या प्री वेडिंग फंक्शनमध्ये जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली.

अंबानी कुटुंबाला विशेषतः गुजराती आणि साऊथ इंडियन पदार्थ खाण्यास प्रचंड आवडतात. बंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमधून पाहुण्यांसाठी खास साऊथ इंडियन पदार्थाची व्यवस्था करण्यात आली. कॅफेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर याचे काही फोटोही शेअर करण्यात आलेत. मुकेश अंबानी यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, त्यांना साऊथ इंडियन पदार्थ आवडतात.

कॅफेच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, आणखी एक मोठी कामगिरी, आणखी एक यश. स्पेनमधील @celebritycruises वर होत असलेल्या जगातील प्रसिद्ध प्री वेडिंग सेलिब्रेशनचा एक भाग बनताना आम्हाला आनंद होत आहे. @therameshwaramcafe हे साऊथमधील एकमेव रेस्टॉरंट आहे, जे उत्कृष्ट साऊथ इंडियन जेवण देते.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.