India Oil Update : शेवटी आज ज्याची भिती होती तेच घडलं, भारतीयांचं टेन्शन वाढवणारी बातमी, मोठा झटका
India Oil Update : इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिकेने पुकारलेल्या युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. या युद्धाच्या झळा आता सर्वसामान्यांना बसू लागल्या आहेत. आज जे घडायला नको होतं, ज्याची भिती होती तेच घडलय. भारतासाठी हा एक मोठा धक्का आहे.

भारतासह सगळ्या जगासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. आज गुरुवारी पुन्हा एकदा तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ पहायला मिळत आहे. तेलाच्या किंमतीमध्ये 9 टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे. प्रति तेल पिंपाची किंमत 100 बॅरलच्या पुढे गेली आहे. ब्रेंट क्रूडच्या किंमतीमध्ये 9.3 टक्के $100.50 प्रति बॅरल आहे. काल स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये तेल टँकरवर हल्ला झाला. त्यामुळे तेल व एलपीजी पुरावठा बाधित होण्याचा धोका आहे. यामुळे आज पुन्हा एकदा कच्चा तेलाच्या किंमतीने उसळी घेतली आहे. याचा परिणाम आज शेअर बाजारावर पहायला मिळू शकतो. सोमवारी कच्चा तेलाच्या किंमती प्रति तेल पिंप 115 डॉलरपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपेल असं म्हटलं. त्यानंतर प्रति तेल पिंपाची किंमत 85 डॉलरपर्यंत आली. आज सकाळी पुन्हा एकदा प्रति तेल पिंप 100 डॉलरच्या पुढे गेलं आहे. सध्या तरी भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलने सुरु केलेल्या युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. हा तणाव कमी होण्याची कुठलीही चिन्ह दिसत नाहीयत. सोशल मीडियावर जहाजांना आगीच्या ज्वाळांनी वेढल्याचे व्हिडिओ फिरत आहेत. सरकार आणि ऊर्जा कंपन्या आपसात समन्वय साधून तेल आणि LPG गॅस पुरवठ्याच प्रमाण वाढवत आहेत. मात्र, तरीही तेलाच्या किंमती भडकत चालल्या आहेत. पुढच्या आठवड्यात स्ट्रॅटजिक पेट्रोलियम रिझर्व्हमधून 172 मिलियन क्रूड ऑईल बाजारात आणणार असल्याचं अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने जाहीर केलं आहे. तेलाच्या किंमती भडकू नयेत यासाठी हे सर्व सुरु आहे. पण तरीही आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढत चालल्या आहेत.
हा इराणच्या रणनितीचा भाग
इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये हल्ले सुरु आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मुझ इराणच्या ताब्यात आहे. होर्मुज स्ट्रेट समुद्राची रुंदी 33 किलोमीटर आहे. यात ऑपरेशनल हिस्सा 11 किलोमीटरचा असून तिथून जहाजं ये-जा करु शकतात. होर्मुज स्ट्रेटमध्ये काल जहाजांवर हल्ले झालेत. त्यामुळे आता कुठलही जहाज या मार्गावरुन जाण्याचा धोका पत्करणार नाही. त्याशिवाय इराणकडून आखाती देशातील तेल रिफायनरीजवर हल्ले सुरु आहेत. त्यामुळे अनेक देशांनी तेल उत्पादन बंद केलं आहे. हा इराणच्या रणनितीचा भाग आहे. या सगळ्यात तेल निर्मिती आणि वितरण बाधित होतय. त्याचा थेट परिणाम तेल आणि गॅसच्या किंमती भडकण्यामध्ये होतोय.
