AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol, Diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

Petrol, Diesel Rate पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

Today Petrol, Diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 06, 2022 | 8:44 AM
Share

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) भावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या 73 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol, Diesel Rate) जौसे थे आहेत. 21 मे रोजी केंद्र सरकारकडून महागाईला आळा घालण्यासाठी पेट्रोल, डिझेलच्या एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. एक्साईज ड्यूटीमध्ये करण्यात आलेल्या कपातीनंतर 22 मे रोजी पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी स्वस्त झाले तर डिझेल प्रति लिटर सहा रुपयांनी स्वस्त झाले तेव्हापासून देशात पेट्रोल,डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्याबाबत बोलायचे झाल्यास नवे सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल , डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जनतेला थोडा दिलासा मिळाला. मात्र तरी देखील राज्यातील इंधनाचे दर हे इतर राज्याच्या तुलनेत अधिकच आहेत. जाणून घेऊयात देशासह राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

प्रमुख महानगरातील दर

पेट्रोलियम कंपन्यांनी जाहिर केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 तर डिझेल 94.24 रुपये लिटर आहे. तर कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 106.03 रुपये आणि डिझेलचा भाव 92.76 रुपये एवढा आहे. देशाच्या प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना करायची झाल्यास अद्यापही सर्वात महाग पेट्रोल, डिझेल हे मुंबईमध्ये तर सर्वात स्वस्त इंधन दिल्लीमध्ये मिळत आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.6593.14
कोल्हापूर106.0292.54

दररोज जारी होतात इंधनाचे दर

दरम्यान पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी पेट्रोल, डिझेलचे दर जारी केले जातात. पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाचे दर वाढल्यास पेट्रोल, डिझेलचे भाव देखील वाढतात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यास पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतात. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर जारी केले जातात.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...