AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol, Diesel Rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

Today Petrol, Diesel Rates पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात देशासह राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

Today Petrol, Diesel Rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
| Updated on: Aug 05, 2022 | 8:02 AM
Share

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol, Diesel Rates) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या 71 दिवसांपासून राज्यात पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. गेल्या 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे 22 मे रोजी पेट्रोलचे दर प्रति लिटर मागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर सहा रुपयांनी कमी झाले. तेव्हापासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. दुसरीकडे राज्यात नवे सरकार येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला मात्र अद्यापही इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचे दर हे अधिक आहेत. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. जाणून घेऊयात राज्याच्या प्रमुख शहरातील इंधनाचे भाव

प्रमुख महानगरातील भाव

पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 96.72 रुपये एवढा असून, डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 106.03 आणि 92.76 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना करायची झाल्यास सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल हे दिल्लीमध्ये तर सर्वात महाग पेट्रोल, डिझेल हे मुंबईमध्ये आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.6593.14
कोल्हापूर106.0292.54

दररोज सकाळी जारी केले जातात इंधनदर

पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी पेट्रोल, डिझेलच्या किमती जारी करण्यात येतात. पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या भावावर अवलंबून असतात. जर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले तर पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात. त्यामुळे इंधनाचे दर दररोज जारी करण्यात येतात. मात्र सध्या गेल्या दोन महिन्यांपासून देशात पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी