AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price : आठवड्याभरात सोनं जवळपास दीड हजारानं स्वस्त, आणखी किती घसरणार? काय आहेत आजचे दर? वाचा सविस्तर

आठवडाभरात सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झालेली आहे. सोनं जवळपास ह्या आठवड्यात 1460 रुपयांनी स्वस्त झालं आहे. (todays gold rate silver rate)

Gold Silver Price : आठवड्याभरात सोनं जवळपास दीड हजारानं स्वस्त, आणखी किती घसरणार? काय आहेत आजचे दर? वाचा सविस्तर
gold prices jewelry shop
| Updated on: Mar 07, 2021 | 9:34 AM
Share

मुंबई : आठवडाभरात सोन्याच्या दरात (gold rate) चांगलीच घसरण झालेली आहे. सोनं जवळपास ह्या आठवड्यात 1460 रुपयांनी स्वस्त झालं आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आगामी काही काळात हे दर आणखी खाली जातील असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. (todays gold rate silver rate gold price update current rate detail information)

किती घसरलं सोने चांदी?

गेल्या आठवडाभरात सोन्याचे भाव 1460 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. पहिल्यांदाच सोनं प्रती तोळा 45 हजाराच्या खाली आलं आहे. गेल्या दहा महिन्यातला हा सोन्याच्या दराचा निचांक मानता जातो आहे. सोनं 24 कॅरेट असो की 14 कॅरेट. स्वस्त झाले आहेत. सध्या सोन्याचा भाव 44 हजार 500 रुपये इतका आहे तर चांदी प्रती किलो 65 हजार रुपये आहे.

आणखी किती स्वस्त होणार सोनं?

केंद्र सरकारनं अडीच टक्क्याची इम्पोर्ट ड्युटी कमी केली आणि सोनं स्वस्त व्हायला लागलं. गेल्या काही काळात सोनं हे 12 हजार रुपयांनी कमी झालेलं आहे. ते 56 हजार रुपयाच्या वर गेलेलं होतं. आगामी काळात हे दर आणखी कमी होत 42 हजार रुपये प्रती तोळापर्यंत जातील असा अंदाज बाजारातले जाणकार व्यक्त करत आहेत.

5 दिवसात सोनं चांदी स्वस्त झालं?

आठवड्यातले पाच दिवस असे आहेत ज्यावेळेस सोनं आणि चांदी स्वस्त झालं आहे. 1 ते 6 मार्च दरम्यान सोनं जवळपास दीड हजारानं स्वस्त झालं तर चांदी सव्वा तीन हजार रुपयानं.लग्नसराईचे दिवस सुरु झालेले आहेत त्यामुळे सोने खरेदीसाठी हा काळ उत्तम आहे. आगामी काही काळातही हे दर आणखी कमी होतील पण तोपर्यंत लग्नाची तारीख निघून गेलेली असेल. त्यामुळे सोनं खरेदी करायचं असेल तर आता ते करु शकता. गुंतवणुकीसाठी म्हणूनही सोन्याचा विचार करु शकता असं जाणकार सांगत आहेत.

इतर बातम्या :

Health Insurance | हेल्थ इन्शुरन्स काढताय, तर ही माहिती जाणून घ्या

LPG Cylinder Price: सिलिंडर महागलंय, त्रस्त आहात?, मग स्वस्तात गॅस बुक करण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा

विमाही अन् गुंतवणुकीतून चांगला फायदाही… युलिप म्हणजे काय ते जाणून घ्या

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली