Traffic Rules : ट्रॅफिक पोलिस गाडीची थेट चाबीच काढून घेताय? नियम काय सांगतो..

Traffic Rules : पोलिस मामानं तुमच्याही गाडीची चाबी काढून घेतली आहे का? पण नियम काय सांगतो..

Traffic Rules : ट्रॅफिक पोलिस गाडीची थेट चाबीच काढून घेताय?  नियम काय सांगतो..
पोलिसाला कानशीलात लगावणे दुचाकीस्वारांना महागात पडलेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 9:48 PM

नवी दिल्ली : सणासुदीच्या उत्साहात बऱ्याचदा आपण हेल्मेट(Helmet) घालणे विसरतो अथवा कारमध्ये बेल्ट (Seat Belt) लावणे विसरतो. अशावेळी ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) नियमानुसार, तुमच्यावर कारवाई करु शकतो. पण कधी कधी ट्रॅफिक पोलीस बलत्याच वळणावर जातो आणि वाद उद्भवतो. कायद्यानुसार होणारी कारवाई टाळता येत नाही. पण ट्रॅफिक पोलिसांची दमदाटी सहन करण्याची गरज नाही. यासंबंधीचे नियम (Rules) ट्रॅफिक पोलिसांवरही बंधनकारक असतात..

अनेकदा अवेशात येऊन ट्रॅफिक पोलिस गाडीची चाबी काढून घेतात. टायरची हवा काढून घेतात. एवढंच काय तुमच्या मागे बसून गाडी एका बाजूला घ्यायला भाग पाडतात. पोलिसांच्या कामाच्या या पद्धतीवर तुम्ही आक्षेप घेऊ शकता. नियमानुसार पोलिसांना अशा बारा भानगडी करण्याची परवानगी नाही. याविषयीचा नियम काय सांगतो, ते पाहुयात..

मोटार वाहन कायदा 1988 (Motor Vehicles Act 1988) नुसार, ट्रॅफिक पोलिस वाहकाच्या परवानगीशिवाय गाडीची चाबी काढून शकत नाही. पोलिसांना गाडीच्या टायरची हवा काढण्याची तर बिलकूल परवानगी नसते.

हे सुद्धा वाचा

तुमच्यासोबतही अशी घटना घडली तर तुम्ही याविषयीचे मोबाईल रेकॉर्डिंग करुन जवळच्या पोलिस ठाण्यात याची माहिती देऊ शकतात. समोपचाराने प्रकरण मिटत नसेल तर तुम्हाला तक्रार करण्याचाही अधिकार आहे.

वाहन कायद्यानुसार, तुम्ही वाहतूक नियमाची एैशीतशी केली तर तुम्हाला केवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उप निरीक्षक हेच दंड लावू शकतात. अशा कामात वाहतूक हवालदार केवळ मदत करु शकतो.

चालकाला दंड ठोठावताना ट्रॅफिक पोलिसांकडे चालान बुक अथवा ई-चालान मशीन असणे अनिवार्य असते. जर चालान बुक नसेल अथवा ई-चालान मशीन नसेल तर त्यांना दंड लावता येऊ शकत नाही.

कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 100 रुपयांचा दंड लावता येतो. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना 100 रुपयांपेक्षा अधिकचा दंड लावता येतो. एवढेच काय नियम तोडल्यानंतर तुमच्याकडे दंडाची रक्कम नसेल तर तुम्ही ही रक्कम नंतर ही जमा करु शकता.

त्यासाठी कोर्टाचे चालान देण्यात येते. दंडाची रक्कम नसेल तर वाहनधारकांचा परवाना जप्त करण्यात येतो. दंडाची रक्कम जमा झाल्यानंतर परवाना परत करण्यात येतो.

ट्रॅफिक पोलिस कर्तव्यावर, ड्युटीवर असताना त्याने वर्दी घालणे अपेक्षित आहे. त्यावर त्याचे नाव, नेमप्लेट असणे गरजेचे आहे. जर पोलिस साध्या वेशात असेल तर त्याच्याकडे ओळखपत्र असावे.

वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे ही सर्वात पहिली आणि महत्वाची जबाबदारी आहे. त्याच्याकडे वाहनासंबंधीची सर्व कागदपत्रे उपलब्ध असावीत. तसेच वाहन परवानाही असावा. चूक झाली असेल तर त्याने त्वरीत दंड जमा करावा.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.