AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताशी पंगा महागात, तुर्कस्तानच्या कंपनीचा निघाला दम, एका झटक्यात 200 मिलियन डॉलर स्वाहा

Boycott Turkey Impact: भारत आणि पाकिस्तान संघर्षात तुर्कस्तानला पाकिस्तान प्रेम चांगलेच महागात पडले आहे. भारताने तुर्कस्तानविरोधात कारवाई सुरु केली. तुर्कस्तानची कंपनी सेलेबी एव्हिएशनचे सिक्योरिटी क्लियरेन्स रद्द केले.

भारताशी पंगा महागात, तुर्कस्तानच्या कंपनीचा निघाला दम, एका झटक्यात 200 मिलियन डॉलर स्वाहा
तुर्कस्तान कंपनीला फटका.
| Updated on: May 19, 2025 | 11:10 AM
Share

Boycott Turkey Impact: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर पाकिस्तानने केलेले हल्ले भारताने समर्थपणे परतवून लावले. या हल्ल्यात पाकिस्तानच्या भारताने पाडलेल्या शस्त्रास्त्रांची फॉरेन्सिक तपासणी केली. यातून पाकिस्तानने या हल्ल्यासाठी वापरलेले ड्रोन तुर्कस्तान बनावटीचे असल्याचे स्पष्ट झाले. भारतात ‘बायकॉट तुर्की’ मोहीम सुरु झाली. भारताच्या बहिष्कार अस्त्रानंतर तुर्कस्तानच्या कंपन्यांना चांगला फटका बसला आहे. भारत सरकारने तुर्कस्तानची ग्राउंड हॅडलिंग सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपनी सेलेबी एव्हिएशन सिक्योरिटीला दिलेले क्लियरेन्स तात्काळ रद्द केले. या कंपनीत काम करणाऱ्या 3800 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केली. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले. पाकिस्तानने या हल्ल्यात चीन आणि तुर्कस्तानमधून मिळालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला. तसेच तुर्कस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर टीका केली होती. त्यानंतर भारतात Boycott Turkey मोहीम सुरु झाली.

तुर्कस्तानला पाकिस्तान प्रेम चांगलेच महागात पडले आहे. भारताने तुर्कस्तानची कंपनी सेलेबी एव्हिएशनचे सिक्योरिटी क्लियरेन्स रद्द केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिने भारताने हे पाऊल उचलले. भारताने २१ नोव्हेंबर २०२२ रोजी या कंपनीला परवानगी दिली होती. ती परवानगी आता रद्द करण्यात आली. सेलेबी एव्हिएशनकडे देशातील नऊ मोठे एअरपोर्ट आहे. त्यात दिल्ली, मुंबई, चेन्नई यासारखे संवेदनशील विमानतळ आहे. या विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग, कार्गो सेवा आणि एअरसाइड ऑपरेशनसारखे हाय सिक्योरिटी काम या कंपनीकडे होते.

भारतात Boycott Turkey मोहीम सुरु झाली आहे. त्यानंतर तुर्कस्तानमधील पर्यटन आणि तुर्की वस्तूंचा वापर केला जात नाही. तुर्कस्तानच्या पर्यटनास भारतासोबत घेतलेला पंगा महागात पडला आहे. अनेक पर्यटन कंपन्यांनी तुर्कस्तानमधील ट्रीप रद्द केल्या आहेत. तसेच EaseMyTrip, MakeMyTrip आणि Ixigo सारख्या ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म्सने तुर्कस्तान आणि अजरबैजान दौरा न करण्याचा सल्ला दिला आहे. सेलेबी कंपनीची सुरक्षा परवानगी रद्द केल्यानंतर या कंपनीचा शेअरमध्ये मोठी घसरणार झाली आहे. Celebi Airport Services India चे मूल्यांकन २०० मिलियन डॉलरने कमी झाले आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...