AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UIDAI ने देशभरात 166 आधार सेवा केंद्रे उघडली, जाणून घ्या कोणती कामे होणार

UIDAI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, UIDAI 122 शहरांमध्ये 166 एकल आधार नोंदणी आणि अद्ययावत केंद्रे उघडण्याची योजना आखत आहे. आधार सेवा केंद्रे आठवड्यातून सात दिवस उघडली जातात. आतापर्यंत या केंद्रांनी दिव्यांग व्यक्तींसह 70 लाख लोकांची गरज भागवली आहे.

UIDAI ने देशभरात 166 आधार सेवा केंद्रे उघडली, जाणून घ्या कोणती कामे होणार
Aadhar Card Online
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 3:37 PM
Share

नवी दिल्लीः भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) ने देशभरात 166 स्वतंत्र आधार नोंदणी आणि अद्ययावत केंद्रे उघडलीत. शनिवारी एका अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. सध्या 166 पैकी 55 आधार सेवा केंद्र (एएसके) कार्यरत आहेत. याशिवाय बँका, पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकारांद्वारे 52,000 आधार नोंदणी केंद्रे चालवली जात आहेत.

UIDAI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, UIDAI 122 शहरांमध्ये 166 एकल आधार नोंदणी आणि अद्ययावत केंद्रे उघडण्याची योजना आखत आहे. आधार सेवा केंद्रे आठवड्यातून सात दिवस उघडली जातात. आतापर्यंत या केंद्रांनी दिव्यांग व्यक्तींसह 70 लाख लोकांची गरज भागवली आहे. मॉडेल ए च्या आधार सेवा केंद्रांमध्ये (मॉडेल-ए एएसके) प्रतिदिन 1,000 नावनोंदणी आणि अपडेट विनंत्या हाताळण्याची क्षमता आहे. त्याच वेळी मॉडेल बी केंद्रे (मॉडेल-बी एएसके) 500 आणि मॉडेल-सी एएसके 250 ही नावनोंदणी आणि अद्ययावत विनंत्या पूर्ण करू शकतात. आतापर्यंत UIDAI ने 130.9 कोटी लोकांना आधार क्रमांक दिलेत.

आधार सेवा केंद्र खासगीमध्ये उपलब्ध नाही

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, खासगी सेवा केंद्रांवर आधार उपलब्ध नाही. आधार सेवा फक्त बँका, पोस्ट ऑफिसेस, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय आणि UIDAI द्वारे संचालित आधार सेवा केंद्रात उपलब्ध आहेत. आधार केंद्रे खासगीत चालत नाहीत. यासंदर्भात अधिक माहिती राज्य सरकारच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळू शकते (ज्या अंतर्गत आधार केंद्रे चालू आहेत). ” तिथून प्रक्रिया स्पष्ट केली जाऊ शकते.

इंटरनेट कॅफेवाले आधार कार्ड बोर्ड लावून काय करतात?

दुसरीकडे तुम्ही इंटरनेट कॅफेमध्ये आधारचे पोस्टर्स, बॅनर इत्यादी पाहिले असतील. अशा परिस्थितीत ते कसे काम करतात, असा प्रश्न मनात निर्माण होतो. खरं तर कॅफे आधारशी संबंधित सेवा पुरवतात, जी यूआयडीएआय सामान्य माणसाला देते. आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा इतर तपशिलात दुरुस्ती करणे, फोटो बदलणे, पीव्हीसी कार्ड छापणे, सामान्य आधार कार्ड ऑर्डर करणे इत्यादी कामे केली जातात.

UIDAI च्या वेबसाईटवर हे काम तुम्ही स्वतः करू शकता

सामान्य माणूस UIDAI च्या वेबसाईटवर या सर्व गोष्टी स्वतः करू शकतो. आता मोबाईल अॅप्सही आलेत. पण जे टेक्नो फ्रेंडली नाहीत, ते इंटरनेट कॅफेकडे वळतात. या सेवांसाठी UIDAI ने आकारलेली रक्कम, त्यात काही पैसे जोडून, ​​कॅफे मालक सामान्य माणसाकडून घेतो.

कॅफेवाला UIDAI शुल्कापेक्षा जास्त शुल्क घेतो

उदाहरणार्थ, जन्मतारीख सुधारण्यासाठी किंवा पीव्हीसी कार्ड मिळवण्यासाठी यूआयडीएआयची निश्चित फी 50 रुपये आहे, तर कॅफे मालक सामान्य माणसाकडून सुमारे 70 ते 100 रुपये घेतो. अशा प्रकारे, तो अशा कामांसाठी 30 ते 50 किंवा अगदी 100 रुपये कमावतो.

संबंधित बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना डिसेंबर 2021 पर्यंत हवाई तिकिटांवर 50% सूट, जाणून घ्या

Yes Bank चा ‘फेस्टिव्ह’ धमाका, गृह कर्जावरील व्याजदरात 2.25% च्या कपातीची घोषणा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.