AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yes Bank चा ‘फेस्टिव्ह’ धमाका, गृह कर्जावरील व्याजदरात 2.25% च्या कपातीची घोषणा

येस बँकेची ही फेस्टिव्ह ऑफर 31 डिसेंबर 2021 पर्यंत चालेल. व्याजात मोठ्या प्रमाणात कपातीच्या मदतीने बँकेने या तिमाहीत होम लोन बुक दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले. या ऑफर अंतर्गत तुम्ही 35 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी गृहकर्ज घेऊ शकता. प्रीपेमेंट शुल्कदेखील माफ केले गेले आहे. जर तुमचे कर्ज आधीच चालू आहे, तर ते शिल्लक हस्तांतरण करून देखील मिळू शकते.

Yes Bank चा 'फेस्टिव्ह' धमाका, गृह कर्जावरील व्याजदरात 2.25% च्या कपातीची घोषणा
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 8:09 AM
Share

नवी दिल्लीः YES BANK home loan offers : या सणासुदीच्या हंगामात येस बँकेने होम लोनवर दमदार ऑफर जारी केलीय. बँकेने गृहकर्जावरील व्याजदरात 2.25 टक्क्यांची मोठी कपात जाहीर केलीय. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे आणि या काळात गृहकर्ज 6.7 टक्के दराने उपलब्ध केले जात आहे. जर पगारदार स्त्रीने कर्ज घेतले, तर तिच्यासाठी व्याजदर 6.65 टक्क्यांपासून सुरू होईल.

येस बँकेची ही फेस्टिव्ह ऑफर 31 डिसेंबर 2021 पर्यंत चालणार

येस बँकेची ही फेस्टिव्ह ऑफर 31 डिसेंबर 2021 पर्यंत चालेल. व्याजात मोठ्या प्रमाणात कपातीच्या मदतीने बँकेने या तिमाहीत होम लोन बुक दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले. या ऑफर अंतर्गत तुम्ही 35 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी गृहकर्ज घेऊ शकता. प्रीपेमेंट शुल्कदेखील माफ केले गेले आहे. जर तुमचे कर्ज आधीच चालू आहे, तर ते शिल्लक हस्तांतरण करून देखील मिळू शकते.

गृहकर्जाचा कालावधी 35 वर्षांपर्यंत असू शकतो

या फेस्टिव्हच्या धमाक्याबद्दल येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार म्हणाले की, आम्ही आमच्या ग्राहकांना कमी व्याजाने त्यांचे स्वप्नातील घर खरेदी करण्यास मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. गृहकर्जाचा कालावधीही 35 वर्षांपर्यंत ठेवण्यात आलाय. यामुळे ईएमआयचा बोजा आणखी कमी होईल. या व्यतिरिक्त इतर बँकांचे ग्राहक देखील शिल्लक हस्तांतरणाच्या मदतीने या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. पुढील तीन महिन्यांत आमचे गृहकर्ज पुस्तक दुप्पट करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

घरांच्या विक्रीत तेजी येण्याची सर्व शक्यता

गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेट मार्केटमध्ये खूप सुधारणा झाली. घरांच्या विक्रीत तेजी आहे आणि तज्ञांचे म्हणणे आहे की, या सणासुदीच्या काळात घरांच्या विक्रीमध्ये प्रचंड तेजी येईल. अशा स्थितीत बँकेकडून व्याजात एवढी मोठी कपात केल्याचा फायदा ग्राहक घेतील आणि बँकेचे कर्ज पुस्तक वाढण्याची अपेक्षा आहे.

सध्या व्याजदर 8.95 टक्क्यांपासून सुरू होतो

येस बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सध्याच्या माहितीनुसार, आतापर्यंत गृहकर्जासाठी बँकेचा किमान व्याजदर 8.95 टक्के आणि कमाल व्याजदर 11.80 टक्के होता. प्रोसेसिंग फी कर्जाच्या रकमेच्या 2% किंवा किमान 10 हजार जे जास्त असेल.

एलआयसी हाऊसिंग फायनान्स काय ऑफर करते?

सणासुदीपूर्वी अनेक बँकांनी गृहकर्जासाठी व्याजदर कमी केलेत. याशिवाय अनेक प्रकारच्या ऑफर्सही दिल्या जात आहेत. एलआयसी हाऊसिंग फायनान्स आता 6.66 टक्के व्याजाने 2 कोटी रुपयांपर्यंत गृहकर्ज देईल. यापूर्वी ही ऑफर फक्त 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी उपलब्ध होती.

या पाच बँकांनी व्याजदर कमी केलेत

यापूर्वी गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ (HDFC), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BoB) आणि कोटक महिंद्रा बँकेने गृह कर्जावरील व्याजदर कमी केलेत. पीएनबीचा गृहकर्जाचा दर 6.55 टक्क्यांवर आला. दुसरीकडे कोटक महिंद्रा बँकेने गृहकर्जाचा व्याजदर 6.5 टक्के निश्चित केला. एचडीएफसीने ग्राहकांना 6.70 टक्के दराने गृहकर्ज देण्याचा निर्णय घेतला. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI ने गृहकर्जाचा दर 6.70 टक्के केला. बँक ऑफ बडोदाने गृहकर्जाचे व्याजदरही बदलले. त्याने 6.75 टक्के व्याजदर निश्चित केला.

संबंधित बातम्या

मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक, ‘या’ गाड्या होणार प्रभावित

…तर आता रेल्वे त्यांच्या 94 शाळा बंद करणार, जाणून घ्या योजना काय?

Yes Bank’s ‘festive’ blast announces 2.25% cut in interest rates on home loans

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.