AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ujjwala Yojana | गाजावाजाच भारी, उज्ज्वला योजनेत एक ही सिलिंडर नाही दारी, 4.3 कोटी लाभार्थ्यांनी फिरवली पाठ

Ujjwala Yojana | धूर मुक्त भारताचे सरकारचे स्वप्न अखेर भंगले. गाजावाजा करुन सुरु केलेल्या उज्ज्वला योजनेची पोलखोल सरकारी आकड्यातूनच समोर आली आहे. उज्ज्वला योजनेतील 4 कोटी 13 लाख लाभार्थ्यांनी एकदाही एलपीजी सिलिंडर पुन्हा आणले नसल्याचे संसदेत सरकारने स्पष्ट केले.

Ujjwala Yojana | गाजावाजाच भारी, उज्ज्वला योजनेत एक ही सिलिंडर नाही दारी, 4.3 कोटी लाभार्थ्यांनी फिरवली पाठ
उज्ज्वला योजनेकडे पाठImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 02, 2022 | 3:41 PM
Share

Ujjwala Yojana News | धूरमुक्त भारत करण्याच्या सरकारच्या स्वप्नांना अखेर लाभार्थ्यांनीच सुरुंग लावला. गाजावाजा करुन सुरु केलेल्या उज्ज्वला योजनेची पोलखोल सरकारी आकड्यातूनच समोर आली आहे. उज्ज्वला योजनेतील (Ujjwala Yojana Scheme) 4 कोटी 13 लाख लाभार्थ्यांनी एकदाही एलपीजी सिलिंडर पुन्हा घरी न आणल्याचे संसदेत सरकारने स्पष्ट केले. उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या गॅस कनेक्शनच्या रिफिलिंगची आकडेवारी केंद्र सरकारने काल संसदेत दिली. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्यमंत्री (State Minister) रामेश्वर तेली यांनी याविषयीची माहिती राज्यसभेत दिली. ऑगस्टच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली, मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरचे (LPG) दर जैसे थेच आहेत. सरकारने केवळ पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांसाठी अनुदान (LPG) कायम ठेवले आहे. उर्वरित एलपीजी ग्राहकांचे अनुदान रद्द करण्यात आले आहे. परंतु उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकदाही एलपीजी सिलिंडर पुन्हा भरले नसल्याचे सरकारने संसदेत मांडलेल्या आकडेवारीतून दिसून आले

काय सांगते आकडेवारी

उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या गॅस कनेक्शनच्या रिफिलिंगची आकडेवारी राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत सादर केली.उज्ज्वला योजनेतील 4 कोटी 13 लाख लाभार्थ्यांनी एकदाही एलपीजी सिलिंडर पुन्हा भरले नाहीत, अशी माहिती एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी दिली. त्याचबरोबर 7.67 कोटी लाभार्थ्यांनी फक्त एकदाच सिलिंडर भरले आहे. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी संबंधित माहिती मागवली होती.

सातत्याने फिरवली पाठ

रामेश्वर तेली यांनी गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी मांडली. त्यात 2017-18 दरम्यान 46 लाख उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी एकही सिलिंडर रिफिल केला नाही. त्याचबरोबर एकेकाळी रिफिलर्सची संख्या 1.19 कोटी होती. 2018-19 मध्ये 1.24 कोटी, 2019-20 मध्ये 1.41 कोटी, 2020-21 मध्ये 10 लाख आणि 2021-22 मध्ये 92 लाख लाभार्थ्यांनी एकदाही सिलिंडर भरला नसल्याचे त्यांनी सांगितले.

किती मिळाले अनुदान

राज्यमंत्री तेली यांनी सांगितले की, 2018-19 मध्ये 2.90 कोटी, 2019-20 मध्ये 1.83 कोटी, 2020-21 मध्ये 67 लाख आणि 2021-22 मध्ये 1.08 कोटी असे मिळून फक्त एकदाच सिलिंडर रिफिल झाले आहेत. 2021-22 या वर्षात एकूण 30.53 कोटी घरगुती गॅस ग्राहकांपैकी 2.11 कोटी ग्राहकांनी एकदाही गॅस सिलेंडर रिफिल केलेले नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली. त्याचबरोबर 2.91 कोटी ग्राहकांनी एकदा घरगुती गॅस सिलेंडर भरला आहे. एप्रिल 2020 पर्यंत उज्ज्वला गॅसचे सिलेंडर भरल्यावर गरिबांना 162 रुपये अनुदान मिळत होते.

काय आहे नवा नियम?

उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारने 9 कोटी मोफत एलपीजी कनेक्शनचे वाटप केले आहे. या सर्व लोकांनी एलपीजी सबसिडी म्हणून प्रति सिलिंडर 200 रुपये निश्चित केले आहेत. सरकारने वर्षाला 12 सिलिंडरवर अनुदान देण्याचा नियम केला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना सरकार मोफत गॅस कनेक्शन देते.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.