AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्याच्या किंमतीत मोठा उलटफेर? सोन्यावर डॉलर का वरचढ ठरला?,गुंतवणूकदारांनो हे गणित समजून घ्या

अमेरिका-इराण युद्धाने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. संकटात उपयुक्त ठरणारे सोने आता सुरक्षित गुंतवणूकीचे साधन ठरलेले नाही. युद्धाने भाव कोसळत आहेत. काय या मागे नेमके कारण ?

सोन्याच्या किंमतीत मोठा उलटफेर? सोन्यावर डॉलर का वरचढ ठरला?,गुंतवणूकदारांनो हे गणित समजून घ्या
gold and silve rate
| Updated on: Apr 05, 2026 | 7:25 PM
Share

जेव्हा जगात कोणतेही मोठे भू-राजकीय संकट किंवा युद्ध होते, ते सर्वसामान्य गुंतवणूकदार त्याची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात आधी सोन्याच्या गुंतवणूकीकडे धाव घेत असतात. या पिवळ्या धातूवर भारतीयांचा विश्वास अनेक पिढ्यांपासून आहे. मात्र, मार्च २०२६ मध्ये इराण-अमेरिका यु्द्धाने या पारंपारिक भरोशाला दगा दिला आहे. आश्चर्य म्हणजे ज्या अमेरिकेने सक्रीय युद्धात भाग घेतला आहे, त्याच अमेरिकेच्या चलन डॉलरना गुंतवणूकदारांनी डोक्यावर घेत त्यात गुंतवणूक केली आहे. तर संकटात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाणारे सोन्याचे दर वेगाने कोसळत आहेत. चला तर जागतिक बाजारात हा उलटफेर का होत आहे ? याचा तुमच्या बचतीवर काय परिणाम होणार आहे हे पाहूयात….

बाजारातील आकडे पाहिले तर संपूर्ण खेळ समजून येईल. युद्धाच्या सुरुवातीला २ मार्च रोजी सोन्याची किंमत एक दिवसाची उसळी आली आणि सोने दरात 8,500 रुपयांनी वाढ झाली. नंतर सोने पुन्हा जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती करेल असे वाटले होते. मात्र जसजसे युद्ध वाढले तसतसे सोन्यात घसरण सुरु झाली. २३ मार्च पर्यंत सोन्याचे दर १,३५,८४६ रुपयांवर आला. ही उच्चतम दराच्या सुमारे १४.३ टक्क्यांची मोठी घसरण होती. याच्या विपरीत साल २०२५ मध्ये सुमारे १० टक्क्यांपर्यंत घसरणारा डॉलर इंडेक्स आता जबरदस्त पुनरागमन करत आहे. या युद्धा दरम्यान केवळ मार्च महिन्यातच डॉलरमध्ये २ टक्क्यांहून अधिक तेजी आली होती.

डॉलरच्या तेजी मागे तेलाचा खेळ

आता मोठा प्रश्न हा आहे की युद्धात थेट सहभागी असून अमेरिकेचा डॉलर इतका मजबूत कसा होत आहे? एसएस वेल्थ स्ट्रीटचे संस्थापक आणि बाजार तज्ज्ञ सुगंधा सचदेवा यांच्या मते यामागे ‘पेट्रोडॉलर’ची व्यवस्था जबाबदार आहे.वास्तवित जगात तेलाची खरेदी – विक्री मुख्य रुपात डॉलरमध्ये होते. होर्मुझ सामुद्रधुनी वर सातत्याने होत असलेल्या नाकेबंदीने कच्च्या तेलाचा पुरवठा बाधित झाली असून तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तेल महाग झाले याचा अर्थ देशांना याच्या खरेदीसाठी डॉलर खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर डॉलरच्या मागणीत वाढ झाली आहे.

तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईची भीती वाढली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी, अमेरिकेतील व्याजदर दीर्घकाळासाठी उच्च राहण्याची शक्यता आहे. जेव्हा बॉण्डवरील परतावा आणि व्याजदर वाढतात, तेव्हा गुंतवणूकदार थेट परतावा देणाऱ्या ठिकाणी गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. परिणामी, व्याज न देणाऱ्या सोन्यापेक्षा अमेरिकन डॉलर गुंतवणूकदारांना अधिक सुरक्षित आणि आकर्षक वाटतो. शिवाय, अमेरिका स्वतः कच्च्या तेलाचा एक प्रमुख निर्यातदार देश बनला आहे, त्यामुळे तेलाच्या संकटाचा युरोप किंवा आशिया इतका गंभीर परिणाम अमेरिकेवर होत नाहीए असे बाजार तज्ञ अदीब नूरानी यांनी निदर्शनास आणले आहे.

सोन्याचा दबदबा कायमचा संपणार ?

आता सोन्यात गुंतवणूक करणे समझदारी ठरणार नाही का ? तज्ज्ञांचे मते जरी आता डॉलरने सोन्यावर मात केली असली तर ही स्थिती कायम रहाणार नाही. सुगंधा सचदेवा यांच्या मतानुसार अमेरिकेचे आक्रमक धोरण, मनमानी टॅरिफ, निर्बंध थोपवणे, देशाची वाढते कर्ज, दीर्घकाळात डॉलर आधारित यंत्रणेवरील जागतिक विश्वास कमी करत आहेत.

महाग तेल आणि तणावातही रोखीचा ( डॉलर ) दबदबा असला तरी सोने आपले अस्तित्व गमावणार नाही. भविष्यात जगातल्या वित्तीय व्यवस्थेत कोणतेही दरार आली तर मुद्रा मुल्यात घसरण होईल आणि सोने मजबूत ढाल म्हणून समोर येईल. दीर्घकाळाचा विचार करता सोने हे तुमची संपत्ती सुरक्षित राखण्याचा एक चांगला आणि विश्वासार्ह मार्ग आहे.

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.