Unit Linked Insurance Plan : विमा तर मिळणारच, वर्षभरात किती रुपये गुंतवल्यावर मिळणार 10 पट परतावा

लोक आपल्या जीवनात अनेक प्लॅन बनवतात. कारण, बिकट परिस्थितीत, महागाईच्या काळात आपले स्वप्न पूर्ण करता येतील. LICचा यूलिप प्लॅन अशा वाईट काळात तुम्हाला सहाय्यभूत ठरतो.

Unit Linked Insurance Plan : विमा तर मिळणारच, वर्षभरात किती रुपये गुंतवल्यावर मिळणार 10 पट परतावा
एलआयसी

नवी दिल्ली : LIC च्या युलिप प्लान फक्त सुरक्षा कव्हरच देत नाहीत तर भविष्यात आजसारखीच जीवनशैली कायम राखण्यासाठी तुमची मदत करतो. लोक आपला परिवार, मुलं बाळं आनंदी राहावे आणि समृद्धी कायम राहावी म्हणून मेहनत घेतात. लोक आपल्या जीवनात अनेक प्लॅन बनवतात. कारण, बिकट परिस्थितीत, महागाईच्या काळात आपले स्वप्न पूर्ण करता येतील. LICचा युलिप प्लॅन अशा वाईट काळात तुम्हाला सहाय्यभूत ठरतो.(What Is the LIC’s Ulip Insurance Policy?)

युलिप प्लॅनमध्ये इन्श्युरन्ससह गुंतवणुकीचीही सुविधा देतं. LICची युलिप तुम्हाला फायनान्सियल फ्लेक्झिबिलीटीही देतं. तुम्ही 4 हजार रुपये प्रति महिना किंवा कमीत कमी 1 लाख रुपये सिंगल पेमेंट करु यूलिक सुरु करु शकता.

युलिप म्हणजे काय?

युनिट-लिंक्ड विमा योजना म्हणजे विमा पॉलिसी आणि मार्केट लिंक्ड गुंतवणूक उत्पादनांची सांगड. या पॉलिसीअंतर्गत प्रीमियमचा काही भाग इक्विटी किंवा डेट फंडात गुंतविला जातो. या उत्पादनात विमा आणि गुंतवणुकीचे एकीकरण 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह असते. जोखमीनुसार ग्राहकांना मोठ्या, मध्यम किंवा स्मॉल कॅप, कर्ज किंवा संतुलित गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी मिळते. त्याचबरोबर वेगवेगळ्या फंडांमध्ये स्विच करण्याची देखील परवानगी आहे. युलिपमध्ये दोन प्रकारचे पर्याय असतात, एक पेन्शन आणि दुसरं एन्डॉव्हमेंट असते.

युलिप्सशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

एलोकेशन, पॉलिसी एडमिनिस्ट्रेशन, मॉर्टेलिटी आणि फंड मॅनेजमेंट चार्ज. फंड व्यवस्थापन शुल्क 1.35% आहे. तुम्ही यूलिपमध्ये गुंतवणूक करून आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत वजावटीचा दावा करू शकता. मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात एलटीसीजी कर आकारणीतून युलिपला सूट देण्यात आली होती. हे एक EEE(सूट अपवादमुक्त) उत्पादन आहे, ज्यामध्ये कलम 80 सी अंतर्गत कर सूट मागितली जाऊ शकते. आपल्याला युलिपमध्ये गुंतवणूक करायची असेल तर प्रथम आपण हे उत्पादन गुंतवणुकीचे साधन म्हणून किंवा लाइफ कव्हर म्हणून पाहत आहात की नाही याचा विचार करा. त्यात गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी बराच काळ असावा आणि तुम्हाला बाजाराशी संबंधित उत्पादनांविषयी माहिती असावी.

युलिप हे लाइफ कव्हर उत्पादनाशिवाय विशेष असे काही खास नाही, कारण यात विमा रक्कम प्रीमियमच्या 10-15 पट मर्यादित आहे.1 कोटीच्या कव्हरच्या युलिप योजनेचे प्रीमियम 2 ते 3 लाख असेल तर 1 कोटीच्या मुदतीच्या योजनेचे प्रीमियम 7000-8000 असेल. गुंतवणुकीच्या बाबतीत युलिप योजना 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसाठी असते.

संबंधित बातम्या :

Budget 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार

Modi Government Disinvestment Plan : LIC चा IPO लवकरच; एअर इंडिया आणि BPCL ला कधी विकणार?; मोदी सरकारकडून खुलासा

What Is the LIC’s Ulip Insurance Policy?

Published On - 9:00 pm, Thu, 11 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI