AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC IPO : ‘एलआयसी’ची गूड न्यूज! भागधारकांना प्रति शेअर लाभांश; लवकरच होणार घोषणा

शेअर्सच्या किंमतीत होणाऱ्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे. दरम्यान, एलआयसी गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कंपनी पहिला आर्थिक तिमाही अहवाल घोषित करण्याच्या तयारीत आहे.

LIC IPO : ‘एलआयसी’ची गूड न्यूज! भागधारकांना प्रति शेअर लाभांश; लवकरच होणार घोषणा
एलआयसीImage Credit source: tv9
| Updated on: May 24, 2022 | 5:15 PM
Share

नवी दिल्ली : बहुचर्चित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) आयपीओची सर्वत्र चर्चा होती. गुंतवणुकदारांनी शेअर्स नोंदणीसाठी बंपर प्रतिसाद दिला. मात्र, अपेक्षित कामगिरी अभावी गुंतवणुकदारांचा भ्रमनिरास झाला. शेअर्सच्या किंमतीत होणाऱ्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे. दरम्यान, एलआयसी गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कंपनी पहिला आर्थिक तिमाही अहवाल घोषित करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत गुंतवणुकदारांना लाभांश (डिव्हिडंड) (Dividend) देण्याची घोषणा केली जाणार आहे. एलआयसीने बीएसई (Bombay stock exchange) सोबतच्या पत्रव्यवहारात 30 मे रोजी पहिला तिमाही आर्थिक पाहणी अहवाल जारी करणारे असल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात अहवालावर चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर लाभांशाची (डिव्हिडंड) निश्चिती केली जाईल, अशी माहिती एलआयसीच्या सूत्रांनी दिली आहे.

बंपर डिव्हिडंड

अर्थजाणकारांच्या मते, शेअरच्या किंमतीत घसरणीनंतरही एलआयसीच्या गुंतवणुकदारांना लाभ होणार आहे. गेल्या वर्षी कंपनीनं लाभांश दिला नव्हता. एलआयसीमधील 25 टक्के शेअर विक्रीचं सरकारचं धोरण आहे. आतापर्यंत 3.5 टक्के शेअरची विक्री करण्यात आली आहे. आगामी काळात सरकार एफपीएओ बाजारात सूचीबद्ध सुरू करू शकते. अर्थजाणकारांनी एलआयसी गुंतवणुकदारांना बंपर सवलत मिळण्याची अंदाज वर्तविला आहे.

LIC शेअर निचांकी स्तरावर

LIC शेअरने नीच्चांकी स्तर गाठला. आजच्या व्यवहाराच्या दिवशी एलआयसी शेअरचा भाव सर्वकालीन नीच्चांकी 856 रुपयांवर पोहोचला. एलआयसी शेअर 17 मेला बाजारात लिस्ट(सूचीबद्ध) झाला होता. शेअरची इश्यू प्राइस 949 होती. मात्र, लिस्टिंग 867 रुपयांवर झाला होता. बहुप्रतिक्षित एलआयसीचा शेअर शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. मात्र, सूचीबद्धतेच्या दिवशीच एलआयसी आयपीओ शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदविली गेली होती. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर एलआयसीचा शेअर 7.77 टक्के घसरणीसह 875 रुपयांवर बंद झाला होता.

सवलतींचा वर्षाव

एलआयसी आयपीओसाठी प्रति शेअर 902-949 रुपयांचा प्राईस बँड (Price band) निश्चित करण्यात आला होता. मात्र, एलआयसी पॉलिसीधारक, कर्मचारी किंवा रिटेल गुंतवणुकदार असल्यास 60 रुपयांचा डिस्काउंट दिला होता. एलआयसीने पॉलिसी धारकांसाठी प्रति शेअर 60 रुपये, रिटेल गुंतवणुकदार (Retail investor) तसेच कर्मचाऱ्यांसाठी 45-45 रुपये शेअर डिस्काउंट देण्याची घोषणा केली होती.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.