Elon Musk vs Mukesh Ambani : ‘आम्ही पण कॉम्पिटिशनला नाही घाबरत, आम्ही सुद्धा..’ मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीच एलॉन मस्कला सडेतोड प्रत्युत्तर
Elon Musk vs Mukesh Ambani : अमेरिकी उद्योजक एलॉन मस्क यांनी स्टारलिंकला मंजुरी मिळत नाहीय, म्हणून एक टि्वट केलं. त्यावरुन भारतीय राजकारणात वादळ आलं. आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मस्क यांना उत्तर दिलं आहे.

अमेरिकी उद्योगपती एलॉन मस्क यांच्यामुळे भारतीय राजकारणात वादळ आलं आहे. त्यांच्या स्टारलिंक कंपनीला इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी परवानगी मिळत नाहीय. त्यावरुन त्यांनी सरकारविरोधात एक टि्वट केलं. यावरुन वाद सुरु झाला. आता रिलायन्स इंडस्ट्रीजने आपली बाजू मांडली आहे. भारतात सॅटलाइट इंटरनेट क्षेत्रातील स्पर्धेचं आम्ही स्वागत करतो असं रिलायन्सने म्हटलं आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कंपनीला भारतीय कायदा आणि नियमांचं पालन करावं लागेल असं रिलायन्सने स्पष्ट केलय. स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO एलॉन मस्क यांच्या टिप्पणीनंतर रिलायन्सने हे स्टेटमेंट केलं आहे. भारतात काही व्यावसायिकांचे हितसंबंध स्टारलिंकची सेवा सुरु करण्यात अडथळा ठरत आहेत असा आरोप मस्क यांनी केला होता. मस्क यांनी अंबानी आणि भारतीय टेलीकम्युनिकेशन इंडस्ट्रीमधील स्पर्धेवरही प्रश्न उपस्थित केले होते.
रिलायन्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपली बाजू मांजली आहे. एक्स कंपनीची मालकी सुद्धा एलॉन मस्क यांच्याकडेच आहे. “आम्ही कधीच स्पर्धेला घाबरत नाही. ग्राहकांना सर्वात चांगली सेवा कोण देणार हे आमच्यासाठी महत्वाचं आहे” असं रिलायन्सने म्हटलं आहे. रिलायन्सने आपला टेलीकम्युनिकेशन बिझनेस ‘जियो प्लेटफॉर्म्स’चं उदहारण दिलं. कंपनीने वर्ष 2016 मध्ये भारताच्या टेलीकम्युनिकेशन मार्केटमध्ये पाऊल ठेवलं. त्यावेळी त्यांच्याकडे एकही ग्राहक नव्हता. “पुढच्या 10 वर्षात जियोच्या ग्राहकांची संख्या 53 कोटीपेक्षा अधिक झाली. भारतीय नागरिकांना चांगल्या डिजिटल सुविधा आणि जगातील सर्वात स्वस्त मोबाइल डेट उपलब्ध करुन दिला” असा रिलायन्सने दावा केला आहे.
सर्व व्यवस्था कायद्याच्या चौकटीतच चालते
स्टारलिकंसह सॅटलाइट बेस्ड कम्युनिकेशन क्षेत्रात येणाऱ्या सर्व कंपन्यांचं आम्ही स्वागत करतो असं रिलायन्सने म्हटलं आहे. “जियोसह प्रत्येक कंपनीला भारतीय लोकांच्या हिताच्या दृष्टीने काम करावं लागेल. देशाचा कायदा आणि धोरणाचं पालन करावं लागेल. भारतात गुंतवणूक आणि नव्या प्रयोगांचं स्वागत होतं. मग, भले ती देशी कंपनी असो किंवा विदेशी. पण सर्व व्यवस्था कायद्याच्या चौकटीतच चालते”असं रिलायन्स म्हटलं आहे.
एकाधिकार शाही होणार नाही
सॅटलाइट बेस्ड कम्युनिकेशन सर्विसेजसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक कंपनीसाठी समान प्रक्रिया लागू होते. आम्ही सुद्धा सॅटलाइट सेवेच्या मंजुरीसाठी प्रतिक्षेत आहोत असं रिलायन्सने म्हटलं आहे. स्टारलिंक भारतात सॅटलाइट बेस इंटरनेट सेवा सुरु करण्याच्या तयारीत असताना रिलायन्सने हे स्टेटमेंट दिलय. सॅटलाइट इंटरनेट क्षेत्रात स्टारलिंकच्या एन्ट्रीने विद्यमान कंपन्यांधील स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. सॅटलाइट संचार क्षेत्रात एकाधिकार शाही होणार नाही हे सरकारने सुद्धा म्हटलय.
