AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाणं छोटसंच, पण विकताना खणखणीत वाजलं; 138 कोटीला विक्री; वाचा खासियत!

एखादे दुर्मिळ नाणे 1-2 लाख नव्हे तर 138 कोटी रुपयांना विकले गेले तर... विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. (US Double Eagle Gold Coin Sells For A Record Rs 138 Crore)

नाणं छोटसंच, पण विकताना खणखणीत वाजलं; 138 कोटीला विक्री; वाचा खासियत!
US Double Eagle Gold Coin
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 3:01 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दुर्मिळ आणि जुन्या नोटा आणि नाण्याचा संग्रह करण्याचे प्रमाण वाढलं आहे. ज्या लोकांना नाणी-नोटांचा संग्रह करण्याचा शौक असतो, ते या नोटा किंवा नाणी त्याच्या किंमतीच्या कित्येक जास्त पट रक्कम देऊन विकत घेतात. त्यामुळे जर तुमच्याकडे एखाद्या विशिष्ट नंबरची किंवा एखाद्या ठराविक काळातील नाणं असेल तर ते तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकते. (US Double Eagle Gold Coin Sells For A Record Rs 138 Crore)

अनेकदा एक रुपयांच्या एका दुर्मिळ नाण्यासाठी काही जण हजारो तर काही लाखो रुपये खर्च करतात. पण जर असेच एखादे दुर्मिळ नाणे 1-2 लाख नव्हे तर 138 कोटी रुपयांना विकले गेले तर… विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. काही दिवसांपूर्वी एका विशिष्ट दुर्मिळ नाणे हे त्याच्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीने लिलावात विकले गेले आहे.

आता तुम्हाला विचार पडला असेल की त्या नाण्यात असे काय खास होते ज्यामुळे त्याला तब्बल 138 कोटींची बोली लावली गेली. ही घटना नेमकी कुठे घडली? ते नाणं कोणी विकत घेतलं? तसेच या नाण्याचे नेमकं वैशिष्ट्यं काय? या सर्वांची उत्तर जाणून घेऊया.

दुर्मिळ नाण्याचा लिलाव

हा सर्व प्रकार अमेरिकेत घडला आहे. अमेरिकेत एका दुर्मिळ नाण्याचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावादरम्यान हे नाणं 18.9 मिलीयन म्हणजे 138 कोटी रुपयांना विकले गेले. खरतंर हे नाणे सोन्याचे असून त्याची मूळ किंमत ही 20 डॉलर म्हणजे केवळ 1400 रुपये इतकी होती. म्हणजेच 1400 रुपये हे नाणे तब्बल 139 कोटी रुपयांना विकण्यात आले. विशेष म्हणजे या नाण्याच्या लिलावासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या तिकीटाचीही बोली लावण्यात आली. हे तिकीट 60 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

काय आहे खास?

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हे नाणे 1933 वर्षातील आहे. हे नाणे पूर्णपणे सोन्याचे आहे. या नाण्याला डबल ईगल नाणे असे म्हणतात. ज्यामुळे त्याच्या मूल्य लक्षणीयरित्या वाढ होते. हे नाणे एका खासगी व्यक्तीच्या हाती लागले होते. या नाण्याचा लिलाव होण्यापूर्वी हे नाणे 73 कोटी ते 100 कोटी रुपयांच्या दरम्यान विकले जाण्याची शक्यता वर्तवली होती. पण लिलावादरम्यान याची बोली सतत वाढत गेली आणि ते नाणं 138 कोटी रुपयांना विकले गेले

या 20 डॉलरच्या डबल ईगल सोन्याच्या नाण्याच्या एका बाजूला गरुडाचे डिझाईन आहे. तर दुसऱ्या बाजूला Liberty चे चिन्ह आहे. तज्ज्ञांच्या मते हे नाणे अमेरिकेत प्रचलित असणाऱ्या सोन्याच्या नाण्यांमधील शेवटचे आहे, त्यामुळे याचे मूल्य वाढले आहे.

कोणाकडे होते दुर्मिळ नाणे?

मिळालेल्या माहितीनुसार, हे नाणे शू डिझाईनर आणि कलेक्टर स्टुअर्ट विट्जमॅन यांच्याकडे होते. त्यांनी 2002 मध्ये हे नाणे जवळपास 55 कोटींना विकत घेतले होते. यासोबतच त्याच्याकडे तिकिटही होते, जे त्यांनी 60 कोटी रुपयांना विकले होते. हे तिकीट दक्षिण अमेरिकन देशाने छापलेले एकमेव मुद्रांक होते. स्टुअर्ट विट्जमॅन यांना लहानपणापासूनच नाणी आणि शिक्के ठेवण्याची आवड होती. त्यांच्या याच आवडीमुळे आज ते करोडपती झाले आहेत.  (US Double Eagle Gold Coin Sells For A Record Rs 138 Crore)

संबंधित बातम्या : 

तुमच्याकडे दोन रुपयांचं नाणं आहे का? मग तुम्हीही होऊ शकता लखपती, जाणून घ्या कसे?

Personal Loan घेताय, मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Investment tips : 5 वर्षात रक्कम डबल, SIP सुरु करण्यासाठी 5 चांगल्या योजना

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.