Vivek lal : नासा ते नाटो शास्त्रज्ञांचा उल्लेखनीय प्रवास
Dr. Vivek lal : डॉ. विवेक लाल म्हणजे एक असामान्य व्यक्तिमत्व आहे. नासा ते नाटो असा त्यांचा थक्क करणारा प्रवास तुम्हाला प्रेरणादायी ठरेल. ते कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो येथील जनरल ॲटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

डॉ. विवेक लाल म्हणजे एक असामान्य व्यक्तिमत्व आहे. नासा ते नाटो असा त्यांचा थक्क करणारा प्रवास तुम्हाला प्रेरणादायी ठरेल. ते कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो येथील जनरल ॲटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जनरल एटॉमिक्स आणि त्याच्या संलग्न कंपन्या जगातील पाच खंडांवर राज्य करत आहेत. सदर कंपनी मानवरहित विमानांची मालिका (प्रिडेटर रेस्पर गार्डियन) तयार करते आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल, रडार, सिग्नल एलिजेंस आणि ऑसोमेटेड आर्बक्सेन सर्व्हेलन्स सिस्टमची सेवा देते. जीए इलेक्ट्रो-मॅग्नेटिक एअरक्राफ्ट लाँच आणि रिकव्हरी सिस्टम, सॅटेलाइट सर्व्हेलन्स, इफेक्टोनेटिक टॉल गियुन हाय पॉवर लेसर, हायपरव्होलॉसिटी प्रोजेक्टाइल आणि पॉवर कंपनी सिस्टम तयार करण्याचे काम करते. जीए जनरेशन न्यूक्लियर फेजन आणि उच्च तापमान मटेरियल पीईएसमध्ये आघाडीवर आहे.
डॉ. लाल मानद विद्वान
डॉ. लाल हे डिस्टिंग्विश्ड व्हिजिटिंग फेलो म्हणून प्रतिष्ठित स्टॅनफॉन्ट युनिव्हर्सिटीच्या हूवर इन्स्टिट्यूशनमध्ये सेवा बजावतात. तर वॉशिंग्टन येथील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधील स्पेसी पॉलिसी इन्स्टिट्यूटने त्यांना प्रगत अवकाश तंत्रज्ञान आणि जागतिक सुरक्षा धोरणांवर प्रकाश टाकल्याने त्यांना मानद विद्वान म्हणून नियुक्त केले आहे. त्यांना इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातही व्हिजिटिंग फेलो म्हणून नियुक्त केले आहे.
जिनेव्हा येथील वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रोमोशन एजन्सीज (WAIPA) च्या बिझनेस ॲडव्हायझरी बोर्डवर पण डॉ. लाल यांनी छाप सोडली आहे. ही संघटना 105 हून अधिक देशांच्या राष्ट्रीय पीएची सदस्य असलेली मोठी गुंतवणूक संस्था आहे. इतकेच नाही तर व्हाईट हाऊसने घोषित केलेल्या क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्कच्या अॅडव्हायझरी बोर्डवरही त्यांची वर्णी लागलेली आहे. त्यांना पेंटागॉन युनायटेड स्टेट्स टेक्निकल टीमच्या माध्यमातून नाटो एसटीओ (विज्ञान आणि तंत्रज्ञान संघटना) मध्ये सदस्य बहुमान मिळालेला आहे. ते अमेरिकन सोसायटी ऑफ मॅकेनिकल इंजिनिअर्सच्या (ASME) उद्योग सल्लागार बोर्डात सहभागी आहेत.
डॉ. लाल हे यूएस चेंबर ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार गटात तसेच यूएस जपान बिझनेस कौन्सिलच्या संचालक मंडळात आणि वॉशिंग्टन डीसी येथील यूएस इंडिया बिझनेस कौन्सिलच्या जागतिक संचालक मंडळातही त्यांचा समावेश आहे. ते कॅलिफोर्निया विद्यापीठ सॅन दिएगो येथील स्कूल ऑफ ग्लोबल पॉलिसी अँड स्ट्रॅटेजीमधील आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळात तसेच सॅन दिएगो स्टेट युनिव्हर्सिटी येथील सेंटर फॉर ॲडव्हान्सिंग ग्लोबल बिझनेसच्या मंडळात सहभागी आहेत.
डॉ. लाल यांची अमेरिकेच्या कॅबिनेट सेक्रेटरींना वॉशिंग्टन डीसीमधील फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन सारख्या संस्थांचा समावेश असलेल्या वाहतूक विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. ही संस्था अमेरिका आणि जागतिक विमान वाहतूक धोरणे आणि तंत्रज्ञानासंबंधीच्या धोरणावर परिणाम करते. डॉ. लाल यांनी एरोनॉटिक्स स्ट्रॅटेजी अँड बिझनेस डेव्हलपमेंटचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. ब्लूइंग कंपनीसोबत 15 वर्षे व्यावसायिक विमाने तसेच संरक्षण, अवकाश आणि सुरक्षा या दोन्ही क्षेत्रात अनेक मार्केटिंग आणि अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे.
डॉ. लाल यांनी एम्ब्री-रिडल, मॅककोनेली एअर फोर्स बेस येथे सहायक फॅकल्टी सिली सदस्य म्हणूनही काम केले आहे. 2005 मध्ये सुरू झालेल्या यूएस इंडिया ॲडेशन कोऑपरेशन प्रोग्रामचे संस्थापक सह-अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत. बोईंग करण्यापूर्वी त्यांनी रेथियनसाठी काम केले आणि नासा एम्स रिसर्च सेंटरमध्ये विविध बहुविद्याशाखीय अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन केले. डॉ. लाल हे न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांचे विशेष अधिवक्ता होते. ज्यामध्ये त्यांनी बहुराष्ट्रीय संस्थेच धोरण आणि त्याची अंमलबजावणी यांचे नेतृत्व केले आहे.
फोर्ब्सच्या मुखपृष्ठावर झळकले
डॉ. लाल हे जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेतील आघाडीच्या व्यवसाय मासिक फोर्ब्सच्या मुखपृष्ठावर झळकले. डॉ. लाल यांनी कॅनडातील कार्लेटन विद्यापीठातून मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी आणि फ्लोरिडातील एम्ब्री-रिडल एरोनॉटिकल विद्यापीठातून एरोनाउ टिझल अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी कॅन्ससमधील विचिटा स्टेट विद्यापीठातून एअरो-स्पेस अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. आणि सिएटलमधील सिटी विद्यापीठातून एमबीए केले आहे. त्यांनी वॉशिंग्टन डीसीमधील अमेरिकन मॅनेजमेंट सोसायटीमध्ये व्यवस्थापन आणि निबंधक अभ्यासक्रम देखील पूर्ण केले आहेत. हायर यांनी फ्लोरिडातील फिनिक्स आंतरराष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण केंद्रात खाजगी पायलट म्हणून प्रशिक्षण घेतले होते. डॉ. लाल हे एक अमेरिकन नागरिक आहेत. ते आशिया, आफ्रिका आणि युरोपसह अनेक ठिकाणी राहिले आहेत. ते पाच भाषा बोलतात.
