AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Warren Buffett: हो, त्याच 5 चुका ज्या मध्यमवर्गाला करतात बरबाद, पण हे लोक अब्जाधीश होतात, वॉरेन बफेंचा मोलाचा सल्ला

Warren Buffett Advice: दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी मध्यमवर्ग का मागे राहतो आणि त्या कोणत्या चुकांमुळे त्यांचा श्रीमंताचा मार्ग हुकतो याचे चिंतन केले आहे. त्यांनी याविषयीचा मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी अनुभवाची शिदोरी उघडली आहे.

Warren Buffett: हो, त्याच 5 चुका ज्या मध्यमवर्गाला करतात बरबाद, पण हे लोक अब्जाधीश होतात, वॉरेन बफेंचा मोलाचा सल्ला
वॉरेन बफेंचा मोलाचा सल्ला
| Updated on: Apr 03, 2026 | 4:22 PM
Share

Warren Buffett Advice: जगातील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या मते आर्थिक संकट हे काही अचानक येत नाही. काही छोट्या चुका आणि दुर्लक्षामुळे अनेकांची बचत हळू हळू कमी होते. बफे यांनी मध्यमवर्ग मागे का राहतो आणि कोणत्या चुकांमुळे त्याचा श्रीमंतीचा मार्ग हुकतो याचे विश्लेषण केले आहे. बफे यांनी याविषयीचा मोलाचा सल्ला दिला आहे. काही चुका टाळल्या तर अनेक मध्यमवर्गीय हे सुद्धा श्रीमंत होऊ शकतात, आर्थिक स्थिरता प्राप्त करू शकतात असा सल्ला त्यांनी दिला आहे.

क्रेडिट कार्डच्या मायाजालापासून वाचा

वॉरेन बफे यांच्या मते, क्रेडिट कार्डच्या व्याजाचा चक्करमध्ये एकदा व्यक्ती आला की त्यातून तो बाहेर पडणे अशक्य होते. जर एखादी व्यक्ती क्रेडिट कार्डवरील व्याजापोटी 18 टक्क्यांहून अधिक व्याज देत असेल तर त्याच्या कमाईचा मोठा वाटा तो व्याजात खर्च करत आहे. कोणताच गुंतवणूकदार, फर्म, बँक कोणत्याच गुंतवणुकीवर 18 टक्के व्याजदराची हमी देत नाही.

झटपट श्रीमंत होण्याचा शॉर्टकट

वॉरेन बफे यांच्या मते आज जे झाड फळ देत आहे, ते अनेक वर्षांपूर्वी लावण्यात आले होते. त्याच पद्धतीने संपत्तीतही हळूहळू पण एका टप्प्यात वाढ होते. अनेक मध्यमवर्गीय लोक श्रीमंत होण्याच्या चक्करमध्ये त्यांचा धैर्य सोडतात आणि नको तिथे गुंतवणूक करून पायावर धोंडा पाडून घेतात. बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक आणि त्यातून फायद्याचे गणित समजायला हवे.

गरजेपेक्षा मोठी घर खरेदी

जर तुम्ही गरजेपेक्षा मोठे घर खरेदी केले असेल तर ही एक मोठी चूक ठरू शकते. त्यासाठीचे उत्पन्न जर तुमच्याकडे नसेल तर आणि ईएमआयसाठीची तुमची रक्कम खर्ची होत असेल तर तुम्ही बचत करू शकणार नाही आणि श्रीमंतीचा मार्ग हुकेल. अंथरूण पाहून पाय पसरणे वाईट नाही. कारण त्यातून गरजा आणि अपेक्षा याचातील दरी स्पष्ट होते. तर अनेकांना उत्पन्नाचे स्त्रोत शोधण्यास मदत होते.

गरज नसेल तर चारचाकी दारी शोसाठी कशाला?

वॉरेन बफे यांच्या मते कार जर गरजेची असेल तरच ती खरेदी करा. गरज नसताना कारची खरेदी ही पांढऱ्या हत्तीची खरेदी ठरेल. बफे म्हणाले की त्यांनी कित्येक वर्ष जुनी कार चालवली. नवीन कार खरेदीसाठी कर्ज आणि त्यावरील व्याज याची परतफेड करण्यात मोठी रक्कम खर्ची पडते.

लॉटरी आणि जुगाराचे व्यसन

बफे यांच्या मते अनेक जण केवळ नशीबावर भरवसा ठेवून आरामात राहतात. ते रोज लॉटरीचे तिकीट काढतात. नाहीतर जुगाराचा डाव टाकतात. त्यांना वाटतं एक ना एक दिवस त्यांना लॉटरी लागेल. पण कित्येक जण या व्यसनात बरबाद होतात. हाती असलेला पैसाही ते गमावून बसतात.

Follow Us
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून...
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून जोरदार बॅनरबाजी
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..