नव्या वर्षात सोने खरेदीचा बेत आखताय? मग ही स्वस्त मस्त योजना वाचा

| Updated on: Jan 16, 2021 | 3:56 PM

सॉवरेन गोल्ड बॉन्डची नवी सिरीज येत्या 28 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. (What Are the benefits of Sovereign gold Bond Scheme)

नव्या वर्षात सोने खरेदीचा बेत आखताय? मग ही स्वस्त मस्त योजना वाचा
Follow us on

मुंबई :  सॉवरेन गोल्ड बॉन्डची नवी सिरीज येत्या 28 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या योजनेच्याअंतर्गत सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 5 हजार रुपये ठरवला गेला आहे. आपणही नवीन वर्षात सोने खरेदी करण्याचा बेत आखला असेल तर ही आपल्यासाठी खास संधी असेल. (What Are the benefits of Sovereign gold Bond Scheme)

भारत सरकारची ही योजना आणि त्याशिवाय आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करु शकता. काय आहेत गुंतवणुकीच्या संधी आपण पाहूयात…

भारत सरकारची ही योजना काय आहे…??

भारत सरकारच्या वतीने, रिझर्व्ह बॅंक प्रत्येक वर्षी सोने खरेदीचे समतुल्य मानले जाणारे सोन्याचे बंधपत्र (Gold Bond) जारी करतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारकडून आपण कमी किमतीला सोने खरेदी करतो. परंतु सरकार सोन्याऐवजी आपल्याला तेवढ्याच किमतीचे रोखे देते (Gold bond) . या योजनेत आपण कमीत कमीत आठ वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतो. यानंतर गुंतवणूक केलेले पैसे आपल्याला एकाच वेळी मिळतात. वास्तविक सोन्याच्या मागणीला कमी करुन ती गुंतवणूक रोख्यांमध्ये करणं, यापाठीमागचा उद्देश आहे.

कोण किती गु्ंतणूक करु शकतो..??

या योजनेअंतर्गत सोने खरेदी करण्याला एक विशिष्ट लिमीट ठेवलेली आहे. आपल्याला या योजनेअंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी एक ग्रॅम सोने खरेदी करावं लागेल. तसंच जास्तीत जास्त आपण 4 किलो सोने खरेदी करु शकता. आपण आपल्या मुलांच्या नावाने देखील या योजनेत गुंतवणूक करु शकतो.

बाजाराच्या किमतीपेक्षा स्वस्त सोने

या योजनेअंतर्गत सध्याची सोन्याची किंमत 5 हजार रुपये प्रति ग्रॅम केलेली आहे. सध्याची सोन्याची बाजारातील किंमत 10 ग्रॅमसाठी 51 हजार 785 रुपये एवढी आहे. यावरुन या योजनेतून सोने खरेदी करणं फायदेशीर असल्याचं दिसून येतं.

(What Are the benefits of Sovereign gold Bond Scheme)

संबंधित बातमी

Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त; पटापट जाणून घ्या आजचे दर