Dharavi Project : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी टाकणार कात..धारावीच्या विकासासाठी अदाणींचा काय आहे मास्टरप्लॅन..

Dharavi Project : आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कसा होणार विकास..

Dharavi Project : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी टाकणार कात..धारावीच्या विकासासाठी अदाणींचा काय आहे मास्टरप्लॅन..
चेहरा मोहरा बदलणारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 5:29 PM

नवी दिल्ली : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी (Asia’s Largest Slum Cluster) धारावी (Dharavi) छोट्या गल्ल्या आणि घाणीमुळे बदनाम आहे. पण या झोपडपट्टीचा चेहरामोहरा बदलणार आहे. जवळपास 10 लाख लोकसंख्येचे घनत्व असलेल्या या प्रदेशात मोठा बदल होणार आहे. आशियातील सर्वात मोठे श्रीमंत उद्योजक गौतम अदाणी (Gautam Adani) यांची कंपनी या झोपडपट्टीचा पूनर्विकास (Redevelopment Project) करणार आहे.

धारावी मुंबईतील मुख्य भागात आहे. एकावेळी येथे चामड्याचा मोठा उद्योग होता. या भागात अनेक छोटे मोठे उद्योग आहे. येथे लोकसंख्येचे मोठे घनत्व आहे. या झोपडपट्टीच्या एका बाजूला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स आहे तर दुसऱ्या बाजूला दादर आहे.

धारावीच्या पूनर्विकास प्रकल्प जवळपास 18 वर्षे जूना आहे. विकासासाठी यापूर्वी चारवेळा प्रयत्न झाले आहे. या 1 ऑक्टोबर रोजी धारावी पूनर्विकास प्रकल्पासाठी चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी जगभरातील आठ मोठ्या कंपन्यांनी रुची दाखवली होती.

हे सुद्धा वाचा

या आठ मोठ्या कंपनीत 5 कंपन्या भारतीय होत्या तर 3 विदेशी कंपन्या होत्या. अदाणी समूहाने सर्वात मोठी 5 हजार 69 कोटींची बोली लावली होती. मंगळवारी यासंबंधीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. DLF समूहाने 2 हजार 25 कोटी रुपयांची बोली लावली होती.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अदाणी समूह एक नवीन कंपनी (SPV) स्थापन करणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या धरतीवर हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य सरकार कोणत्याही कंपनीसोबत काम करुन धारावीचा चेहरा-मोहरा बदलण्याच्या तयारीत होते.

या प्रकल्पात जवळपास 1 कोटी चौरस फूट जागेचा समावेश आहे. त्यापैकी 70 ते 80 लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्र पुनर्वसनासाठी वापरण्यात येईल. तर उर्वरित खुल्या बाजारात विक्री करण्यात येईल. धारावी पूनर्विकास प्रकल्पासाठी जवळपास 20 हजार कोटी रुपयांचा खर्च येईल.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास 17 वर्षे लागतील. त्यातील सात वर्षात पुनर्वसनाचे काम पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पातंर्गत जवळपास 60 हजार कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येईल. या झोपडपट्टीत प्रत्येक कुटुंबाला 405 वर्ग फूट क्षेत्रफळाचे घर मिळेल.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.