Gautam Adani : अदाणी समूहाच्या मालकीनंतर, NDTV च्या चेअरमनपदी राहतील का प्रणय रॉय?

Gautam Adani : आता एनडीटीव्हीच्या चेअरमनपदी प्रणव रॉय राहतील का?...

Gautam Adani : अदाणी समूहाच्या मालकीनंतर, NDTV च्या चेअरमनपदी राहतील का प्रणय रॉय?
मालक बदलणार संचालक बदलणार का?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 8:05 PM

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदाणी (Gautam Adani) लवकरच एनडीटीव्हीचे (NDTV) मालक होतील. ते एनडीटीव्हीचे सर्वात मोठे शेअर होल्डर होण्याच्या अगदी जवळ आहेत. त्यांच्याकडे यापूर्वी या समूहातील 29.18 टक्के हिस्सेदारी आहे. तर आता 26 टक्के हिस्सेदारी खरेदीसाठी अदाणी समूह (Adani Group) ओपन ऑफर घेऊन आला आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणव रॉय हे चेअरमन पदी राहतील की ते पदावरुन पायउतार होतील या चर्चा सध्या रंगत आहेत. अदाणींचे आणि रॉय कुटुंबियांचं याबाबत काय म्हणणे आहे, याविषयी काय चर्चा आहे, ते पाहुयात..

काही दिवसांपूर्वी फायनेन्शियल टाईम्सला गौतम अदाणी यांनी मुलाखत दिली होती. त्यानुसार, एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय यांना चेअरमनपदी राहण्याची ऑफर देण्यात आली आहे. याचा अर्थ अदाणी समूहाकडून त्यांना हटविण्याची तयारी करण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

माध्यमांच्या स्वातंत्र्याविषयी बोलताना अदाणी यांनी महत्वाची गोष्ट सांगितली आहे. त्यानुसार, सरकार काही चुकीचे निर्णय घेत असेल तर त्याविषयी माध्यमांनी बोलायला हवे. पण सरकार चांगले काम करत असेल तर ते मांडण्याची हिंमतही माध्यमांनी दाखवावी असे ते म्हटले.

तर रॉय दाम्पत्याची एनडीटीव्हीत 32 टक्के हिस्सेदारी आहे. ओपन ऑफरच्या माध्यमातून अदाणी समूहाने एनडीटीव्ही खरेदी संबंधात एका शब्दानेही आपली विचारपूस केली नसल्याचे रॉय दाम्पत्याचे म्हणणे आहे.

अदाणी समूहाने हा एनडीटीव्हीचा ताबा मिळविल्यानंतर त्यांचा संपादकीय विभागावर प्रभाव राहिल. बातम्या आणि इतर गोष्टीवर त्याचा परिणाम दिसून येईल असे, रॉय दाम्पत्याला वाटते.

अडाणी समूहाने ऑगस्ट महिन्यात विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेड यांनी वीपीसीएलच्या भागीदारीची घोषणा केली होती. वीपीसीएलने एनडीटीव्हीच्या फाऊंडर्सला 10 वर्षांपूर्वी 400 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

यामध्ये एक क्लॉज होता. ज्यामध्ये वीपीसीएल कधी ही एनडीटीव्हीत 29.18 टक्क्यांची हिस्सेदारी ताबा घेऊ शकते. तर अडाणी ग्रुप या कंपनीत हिस्सेदारी वाढण्यासाठी ओपन ऑफर आणली आहे.

वीसीपीएलच्या सोबत एएमजी मीडिया नेटवर्कस आणि अदाणी एंटरप्राईजेस लिमिटेड एनडीटीव्हीत 26 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. ओपन ऑफरच्या माध्यमातून 294 रुपये प्रति शेअर किंमत 1.67 कोटी शेअरची ऑफर देण्यात येणार आहे. आता अदाणी समूहाची एनडीटीव्हीत जवळपास 55 टक्के हिस्सेदारी होईल.

Non Stop LIVE Update
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?.
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा...
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा....
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा..
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा...
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?.
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका.
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.