ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड चुकीचा टाकला? जाणून घ्या पुढे काय होईल…

ऑनलाईन बँकिंग प्रणालीमुळे पैसे देवाणघेवाणीची प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे. काही मिनिटांतच एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे हस्तांतरिकरता येतात.

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड चुकीचा टाकला? जाणून घ्या पुढे काय होईल...
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 10:46 AM

मुंबई : ऑनलाईन बँकिंग प्रणालीमुळे पैसे देवाणघेवाणीची प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे. काही मिनिटांतच एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे हस्तांतरिकरता येतात. प्रत्येक बँकेचे स्वतःचे बँकिंग अॅप असते आणि ते ग्राहकांच्या सोयीनुसार डिझाइन केलेले असते. यावर्षी पैसे हस्तांतरणाबाबतच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. पण, समजा तुम्ही ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना चुकीचा IFSC (Indian Financial System Code) कोड (wrong ifsc code) टाकला असेल, तर काय होईल? आपले पैसे दुसर्‍याच्या खात्यात जातील का?, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतात (What happens if you entered wrong ifsc code while transferring money online).

पैसे ट्रान्सफरसाठी आयएफएससी कोड आवश्यक

नेट बँकिंगमधून एनइएफटी, आरटीजीएस आणि आयएमपीएसच्या मदतीने पैसे ट्रान्सफर केले जाते. परंतु, एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्या व्यक्तीला बेनिफिशरी म्हणून जोडावे लागेल. तथापि, हे काम बेनिफिशरीशिवाय देखील केले जाऊ शकते. याकरता बेनिफिशरी जोडण्यासाठी जेव्हा उर्वरित माहिती भरता तेव्हा, खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड देखील आवश्यक आहे.

आयएफएससी कोड म्हणजे काय?

भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आयएफएससी कोड दिला आहे. 11 अंकांचा हा कोड इलेक्ट्रॉनिक पेमेंटमध्ये वापरला जातो. या कोडमधील प्रारंभिक 4 अंक अक्षरांमध्ये आहेत, जे बँकेचे नाव दर्शवतात. या कोडचा पाचवा अंक हा नेहमी 0 असतो आणि शेवटचे 6 अंक बँकेची शाखा कोणती आहे, ते दर्शवतात (What happens if you entered wrong ifsc code while transferring money online).

पैसे ट्रान्सफर करताना चुकीचा आयएफएससी कोड टाकल्यास काय होईल?

ऑनलाईन व्यवहार करताना आयएफएससी कोड भरताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण, चुकीचा कोड टाकल्यानंतरही व्यवहार शक्य आहे. परंतु, ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्याचा क्रमांक आणि नाव योग्य असले पाहिजे. उदाहरणार्थ, समजा तुमचे खाते पंजाब नॅशनल बँकेच्या लखनऊ शाखेत आहे. ऑनलाईन ट्रान्सफर करताना पीएनबीच्या लखनौ शाखेच्या आयएफएससी कोडऐवजी तुम्ही नोएडाच्या शाखेचा आयएफएससी कोड प्रविष्ट केला. तरी पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. जरी कोड बदलला गेला असेल आणि बॅंक खाते क्रमांक अचूक असेल, तर व्यवहार होणे शक्य आहे. बऱ्याचदा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी खाते क्रमांक अचूक असणे आवश्यक आहे (What happens if you entered wrong ifsc code while transferring money online).

दुसरी शक्यता…

जर आयएफएससी कोडमध्ये मोठी गडबड झाली, जसे की तुम्ही एसबीआय नोएडाच्या जागी पीएनबी लखनऊचा कोड प्रविष्ठ केला, तर तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात. तथापि, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ग्राहकाचा खाते क्रमांक दोन्ही बॅंकमध्ये एकच असेल. परंतु, याची शक्यता फारच कमी आहे. कोड किंवा खाते क्रमांक जुळत नसल्यास, हे ट्रान्सफर रद्द केले जाईल.

(What happens if you entered wrong ifsc code while transferring money online)

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.