या तीन बँकांचं विलिनीकरण, तुमच्यावर परिणाम काय?

नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेटने बुधवारी बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकच्या विलिनीकरणासाठी मंजुरी दिली आहे. या विलिनीकरणानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआयनंतर देशातली सर्वात मोठी तिसरी बँक अस्तित्वात येईल. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या तीन बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा केली होती. या बदलांमुळे ग्राहकांवरही काही परिणाम होणार आहेत. कस्टमर आयडी आणि खाते …

या तीन बँकांचं विलिनीकरण, तुमच्यावर परिणाम काय?

नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेटने बुधवारी बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकच्या विलिनीकरणासाठी मंजुरी दिली आहे. या विलिनीकरणानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआयनंतर देशातली सर्वात मोठी तिसरी बँक अस्तित्वात येईल. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या तीन बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा केली होती. या बदलांमुळे ग्राहकांवरही काही परिणाम होणार आहेत.

कस्टमर आयडी आणि खाते क्रमांक बदलण्याची शक्यता

विलिनीकरणाचा कोणताही त्रास ग्राहकांना होऊ नये यासाठी काळजी तर घेतली जाईल, पण तुम्हीही यासाठी सतर्क असणं गरजेचं आहे. सर्वात अगोदर या गोष्टीची खात्री करा, की या तीन बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी खात्याशी लिंक आहे किंवा नाही. अन्यथा बँक तुमच्याशी संपर्क करु शकणार नाही. कस्टमर आयडी आणि अकाऊंट नंबर बदलण्याची शक्यता आहे. तुमचं खातं विजया बँक आणि बडोदा बँकेत असेल, तर दोन्हीसाठी एकच खाते क्रमांक दिला जाईल.

थर्ड पार्टीला अपडेट द्यावी लागणार

ज्या ग्राहकांना नवीन अकाऊंट नंबर किंवा आयएफएससी कोड देण्यात आलाय, त्यांनी थर्ड पार्टीलाही ही माहिती द्यावी लागेल. उदाहरणार्थ, आयकर विभाग, विमा कंपनी, नॅशनल पेमेंट सिस्टम किंवा तुम्ही कुणाकडून नियमित पैसे घेत असाल तर अशा व्यक्तींनाही अपडेट द्यावी लागेल.

ECS आणि SIP निर्देश

विलिनीकरणानंतर सर्व इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस म्हणजेच ईसीएस आणि पोस्ट डेटेड चेक क्लिअर करावे लागतील. तुमची बँक किंवा विमा कंपनीकडून तातडीने नवे ईसीएस निर्देश जारी करुन घ्या. ऑटो डेबिट किंवा सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान (SIP) यासाठी तुम्हाला नवा फॉर्म भरावा लागू शकतो. कर्जाच्या हफ्त्यासाठीही हीच प्रक्रिया असेल.

बँकेच्या स्थानिक शाखा बंद होण्याची शक्यता

तुमच्या जवळ असलेली एखादी शाखा बंद होऊ शकते आणि यासाठी तुम्हाला नवी शाखा शोधावी लागेल. नवीन ब्रांच मिळाल्यास आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड लक्षात ठेवावा लागेल.

डिपॉझिट, लेडिंग रेट बदलणार नाही

सध्याच्या तुमच्या फिक्स डिपॉझिट आणि कर्जाच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाही. पण नवीन कर्ज आणि फिक्स डिपॉझिटसाठी तीन बँका मिळून जो दर निश्चित करतील, त्याच दराचा लाभ मिळेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *