AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम अदानींचा कुठे आहे ‘राजमहल’? 400 कोटींचा आलिशान बंगला पाहिलात का?

Gautam Adani Luxurious House: गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा श्रीमंतीत मागे टाकले. ब्लूमबर्गच्या ताज्या आकडेवारीनुसार अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्या श्रीमंतीची झलक त्यांच्या दिल्लीतील आलिशान बंगल्यावरून पाहायला मिळते.

गौतम अदानींचा कुठे आहे 'राजमहल'? 400 कोटींचा आलिशान बंगला पाहिलात का?
400 कोटींचा आलिशान बंगला
| Updated on: Apr 17, 2026 | 3:55 PM
Share

Gautam Adani Luxurious House: ब्लूमबर्गच्या ताज्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. त्यांनी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना श्रीमंतीत मागे टाकले आहे. सध्या जगातील श्रीमंतात अदानी यांचा 19 वा क्रमांक आहे. Hindenburg Research अहवालानंतर जागतिक क्रमवारीतून ते बाद झाले होते. त्यांनी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला आहे. त्यांचे दिल्लीतील आलिशान घर या श्रीमंतीचं प्रतिक आहे.

गौतम अदानी यांचा आलिशान बंगला

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यातील श्रीमंतीचा फरक फार जास्त नाही. मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या गगनचुंबी इमारतीची चर्चा नेहमीच होते. पण अनेकांना गौतम अदानींच्या दिल्लीतील बंगल्याची माहिती नाही. हा बंगला दिल्लीतील लुंटियंस जोन(Lutyens Bungalow Zone) या सर्वात नवकोट नारायणांच्या परिसरात आहे. हा बंगला भगवान दास रोडजवळ(Bhagwan Das Road) आहे. येथून मंडी हाऊस अगदी जवळ पडते.

हा आलिशान बंगला एखाद्या महलापेक्षा कमी नाही. हा बंगला 3.4 एकरावर पसरलेला आहे. त्याचा बिल्टअप एरिया 25,000 चौरस फूट आहे. तर स्टॉफ क्वार्टर्स 7,000 चौरस फूट जागेवर बांधण्यात आलेले आहे. हा 100 वर्षांहून अधिक जूना दोन मजली बंगला आहे. हा बंगला पूर्वी आदित्य इस्टेट्स कडे होता. दिवाळखोरीत हा बंगला NCLT च्या माध्यमातून अगदी स्वस्तात मिळाला आहे. त्याची एकूण किंमत 1000 कोटी इतकी आहे, पण अदानी समूहाला तो 400 कोटी रुपयांमध्ये मिळाला.

हा बंगला आतून अत्यंत भव्य आणि शानदार आहे. या घराची आतील बाजू कधीही समोर आली नाही. पण काही वृत्तानुसार हा बंगल्यात 7 बेडरूम आहेत. आतील रूम अत्यंत भव्य आणि सजावट केलेल्या आहेत. या बंगल्यात काही अत्यंत भव्य हॉलसह लिव्हिंग रूम आणि डायनिंग रुम आहे. समोर आणि मागील बाजूस मोठा बगीचा मन वेधून घेतो. या बंगल्यात एक अभ्यासिका आहे. या घराला खरंच घरपण असल्याचे सांगितले जाते. तिथली भव्यता, रंग, कलाकुसर आणि वाहनतळ, गार्डनर पाहण्यासारखे असल्याचे सांगितले जाते.

Follow Us
क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, सिरसे गावात.....
Nashik | क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, झाडे पडली, सिरसे गावात हाहाकार
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी