AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील 5 गगनचुंबी इमारती कोणत्या ? एका फ्लॅटची किंमत 50 कोटींपर्यंत…

स्वप्नांची नगरी असलेली मुंबई देशाच्या सर्वात उंच आणि आलिशान इमारतींसाठी देखील प्रसिद्ध आहे. देशात असलेल्या एकूण उंच इमारतीपैकी एक मुंबईत तीन चतुर्थांश इमारती आहेत.

मुंबईतील 5 गगनचुंबी इमारती कोणत्या ? एका फ्लॅटची किंमत 50 कोटींपर्यंत...
mumbai's high rise buildings (1)
| Updated on: May 30, 2026 | 4:58 PM
Share

गगनचुंबी इमारती म्हटल्या की अमेरिकेचे ट्वीन टॉवर ( आता नष्ट झालेत ) आणि दुबईची बुर्ज खलिफा ही आकाशाला भिडणारी इमारत नजरेसमोर येते. भारतात इमारती इतक्या उंच नाहीत..तरीही देशात सुमारे २५० गगनचुंबी इमारती आहेत. यातील काही तयार आहेत तर काहींची बांधणी सुरु आहे. यात सर्वाधिक वाटा मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटचा आहे. मुंबई नंतर हैदराबादचा क्रमांक लागतो. उंच इमारतीबाबत मुंबई आशियातील अग्रगण्य शहरात सामील आहे. आणि भारताच्या १५० मीटरहून उंच ७७ टक्के इमारती एकट्या मुंबईत आहेत.

मुंबई शहरात आधीच अशा १०० हून अधिक टॉवर आहेत,त्यामुळे पुढे भविष्यात मुंबईत देशातील सर्वात मोठा ‘टॉलेस्ट- बिल्डींग हब’ बनण्याच्या स्थिती आहे.

महाराष्ट्र सरकारने साल २०२५ मध्ये उंच इमारतींची मर्यादा १२० मीटर वरुन वाढवून १८० मीटर केली होती. १२० मीटर उंचीच्या इमारतीत सुमारे ४० मजल्यांच्या इमारतीचा समावेश होतो. तर १८० मीटर उंच इमारतीत ५० ते ६० मजली इमारतींचा समावेश होतो. मुंबईत मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त आणि बिल्डींग प्रपोजल विभाग १८० मीटर पर्यंतच्या या इमारतींना मंजूरी देते. तर १८० मीटर हून उंच इमारतींचे प्रस्ताव बीएमसीची हायराईज बिल्डींग कमिटी मंजूर करते.

‘पॅलेस रॉयल’ सर्वात उंच

गगनचुंबी इमारतीच्या यादीत सर्वात पहिले नाव वरळीच्या पॅलेस रॉयल इमारतीचे येते. पॅलेस रॉयल सध्या मुंबईती सर्वात उंच आणि राहायला तयार असा निवासी टॉवर आहे. ३२० मीटर उंच आणि ८८ मजल्याच्या या गगनचुंबी इमारतीत खूप आलिशान 4 BHK, 5 BHK आणि पेंटहाउस फ्लॅट्सचा समावेश आहे. बीएमसीने या इमारतीला अंशत: ओसी देखील मिळाली आहे. येथील फ्लॅटची किंमत आकार, मजल्यानुसार १० कोटी पासून ते ५० कोटींपर्यंत आहे.

लोखंडवाला मिनर्व्हा (Minerva), महालक्ष्मी

महालक्ष्मी येथील ‘लोखंडवाला मिनर्व्हा’ मुंबईचा दुसरा सर्वात उंच निवासी रेसिडेंन्शियल टॉवर असून याची उंची ३०१ मीटर आहे आणि यात ९१ मजले आहेत. प्रसिद्ध आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रक्टर यांनी डिझाईन केलेला आहे. यात लक्झरी 3 BHK आणि 4 BHK अपार्टमेंट्स आहेत. त्याची किंमतीही सर्वसाधारणपणे आकार आणि मजल्यांनुसार १० ते १६ कोटी दरम्यान आहे.

पीरामल अरन्या आरव (Piramal Aranya Arav), भायखळा

पीरामल अरन्या आरव हा लक्झरी टॉवर ८३ मजल्यांचा असून २८२.२ मीटर उंच आहे. साल २०२२ मध्ये तयार झालेल्या या टॉवरमध्ये प्रीमियम 2, 3 आणि 4-BHK अपार्टमेंट्स आहे. हे देखील ५ ते २० कोटी दरम्यान आहेत.

लोढा वर्ल्ड टावर (Lodha World Tower), लोअर परळ

चौथ्या क्रमांकावर लोअर परळचा लोढा वर्ल्ड टॉवर आहे. याची उंची २८०.२ मीटर असून ७६ मजले आहे. साल २०२० मध्ये तयार झालेल्या या अल्ट्रा-लक्झरी टॉवरमध्ये 3, 4 आणि 5 BHK फ्लॅट आहेत. या फ्लॅटची किंमत ९ कोटी ते ४० कोटींदरम्यान आहे.

याच परिसरात आणखी एक टॉवर लोढ़ा वर्ल्ड व्यू असून यात ७३ मजले आहेत. २०२०मध्ये तरायर झालेल्या या प्रोजेक्टमध्ये 3 BHK आणि 4 BHK अपार्टमेंट्स असून त्यांची किंमत ८ ते २५ कोटींच्या दरम्यान आहे.

25 साऊथ (25 South), प्रभादेवी

प्रभादेवीत वाधवा ग्रुपचा ’25 साऊथ ही 270 मीटरच्या टॉवरमध्ये ६५ मजल्यांचे आलिशान रेसिडेन्शियल टॉवर असून ते साल २०२१ मध्ये तयार झाले आहेत. येथे ३,४ आणि ५ बीएचकेची प्रीमीयम घरे आहेत. याची किंमत १२ ते ३० कोटी रुपयांचे आहेत.

Follow Us
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्.....
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्......
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली..
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली...
सावलीत बसा... अभ्यासक आल्यावर निर्णय घ्या, पाटलांची जरांगेंना विनंती
सावलीत बसा... अभ्यासक आल्यावर निर्णय घ्या, पाटलांची जरांगेंना विनंती.