AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका कोणत्या? व्याजदर किती, जाणून घ्या

तज्ज्ञांच्या मते बचत खाते हे गुंतवणूकीसाठी योग्य पर्याय मानले जात नाही. पण आपत्कालीन गोष्टींसाठी ठेवलेल्या पैशांसाठी याचा नक्की उपयोग होतो. (Which Banks Provide Highest Savings Account Interest Rates)

बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका कोणत्या? व्याजदर किती, जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 3:39 PM
Share

मुंबई : कोणत्याही नवीन बँकेत खाते उघडण्यापूर्वी किंवा जुन्या खात्यात पैसे जमा करण्यापूर्वी तुम्हाला बचतीवर किती व्याज मिळतो, हे माहिती असणे आवश्यक आहे. अनेकदा पैसे जमा करण्यासाठी बचत खात्याचा उपयोग केला जातो. बचत खात्यात पैसे जमा केल्यामुळे तुम्हाला ते पैसे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत काढता येतात. तसेच ज्या लोकांना गुंतवणूकीच्या विविध योजनांबाबत माहिती नसते त्या व्यक्ती बचत खात्यातच पैसे ठेवण्यास प्राधान्य देतात. (Which Banks Provide Highest Savings Account Interest Rates)

मात्र हे पैसे जमा करताना तुम्हाला कोणत्या बचत खात्यावर किती व्याज मिळतो याची माहिती असणेही गरजेचे असते. त्यामुळे बचत खात्यातील जमा केलेल्या रक्कमेवर जास्त व्याज मिळाल्याने तुम्हाला अधिक फायदा होतो.

तज्ज्ञांच्या मते बचत खाते हे गुंतवणूकीसाठी योग्य पर्याय मानले जात नाही. पण आपत्कालीन गोष्टींसाठी ठेवलेल्या पैशांसाठी याचा नक्की उपयोग होतो. तसेच या रक्कमेवर व्याज मिळल्याने तुमचा दुप्पट फायदा होतो. सध्या बाजारात अशा अनेक बँका आहेत ज्या कमी व्याजदराच्या युगातही बचत खात्यावर चांगले व्याज देतात. सध्या बचत खात्यांवरील सर्वाधिक व्याज देणार्‍या बँकांमध्ये आरबीएल बँक, बंधन बँक आणि येस बँकेचा समावेश आहे.

आरबीएल बँकेतील बचत खात्यावर व्याजदर

सर्व व्यावसायिक बँकांच्या तुलनेत आरबीएल बँक बचत खात्यावर सर्वाधिक व्याज दर देते. आरबीएलच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, RBL ही खासगी क्षेत्रातील बँक बचत खात्यावर 4.5 टक्के ते 6.25 टक्के व्याज देते.

या बँकेत 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 4.5 टक्के व्याज मिळतो. तर 1 लाख ते 10 रुपयांच्या ठेवींवर हा व्याजदर 6 टक्के आहे. त्याशिवाय आरबीएल बँकेत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर 6.25 टक्के दराने व्याज मिळतो.

बंधन बँकेतील बचत खात्यावर व्याजदर

बंधन बँक ही ग्राहकांच्या बचत खात्यावर 3 टक्के ते 6 टक्के व्याज देते. मात्र हा व्याज तुमच्या बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, यावर अवलंबून असते. या बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार ही बँक 1 लाखांपर्यंतच्या ठेवींवर 3 टक्के व्याज देते.

तर 1 लाख रुपये ते 10 लाख रुपयांच्या ठेवींवर 4 टक्के व्याज दिला जातो. तर 10 लाखांहून अधिक ठेवींवर 6 टक्के दराने व्याज दिला जातो.

येस बँक बचत खात्यावर व्याजदर

येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, खासगी क्षेत्रातील Yes बँक बचत खात्यावर आपल्या ग्राहकांना 4 किंवा 5.5 टक्के दराने व्याज देत आहे. ही खासगी क्षेत्रातील बँक 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 4 टक्के दराने व्याज देते.

जर तुम्ही या बँकेत 1 ते 10 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दरवर्षाला 4.75 टक्के दराने व्याज मिळेल. तर दररोज 1 लाख ते 100 कोटी रुपयांच्या ठेवीवर 5.5 टक्के व्याज मिळतो. दरम्यान कोणत्याही बँकेत बचत खाते उघडण्यापूर्वी त्या बँकेचा व्याजदर नक्की तपासा. त्यासोबतच इतरही सेवांची माहिती घेऊनच गुंतवणूक करा. (Which Banks Provide Highest Savings Account Interest Rates)

संबंधित बातम्या : 

1 महिन्यापासून नोकरी नसेल तर पीएफचे हे पैसे उपयोगी येतील, किती पैसे काढता येणार?

केवळ 10000 रुपयांची गुंतवणूक, LIC ची ‘ही’ पॉलिसी तुमच्या मुलाला लखपती बनवणार

अवघ्या 2.60 लाखात मारुतीची शानदार कार खरेदीची संधी, कंपनीकडून डिस्काऊंट जाहीर

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.