Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांना इंग्लंडच्या या दोन भावांचे तगडे आव्हान, औषध कंपनी खरेदीवर पाणी फिरणार?

Mukesh Ambani : मुकेश अंबानी आणि ब्रिटिश ब्रदर्स यांची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. हे ब्रिटिश ब्रदर्स मुळचे गुजरातमधील असल्याने ते चर्चत आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला विस्तार करायचा आहे, पण त्यांना प्रतिस्पर्ध्यांकडून तगडे आव्हान मिळत आहे.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांना इंग्लंडच्या या दोन भावांचे तगडे आव्हान, औषध कंपनी खरेदीवर पाणी फिरणार?
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 10:16 AM

नवी दिल्ली : ब्रिटेनची फार्मसी चेन बूट्ससाठी (Boots) भारतीय दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि ब्रिटिश अब्जाधिश इस्सा ब्रदर्स (Issa brothers) यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. पहिल्या फेरीत इस्सा ब्रदर्सने सर्वाधिक बोली लावली आहे. ही निविदा येत्या काही दिवसात पूर्ण होईल. मुकेश अंबानी हे पण या करारासाठी इच्छुक आहेत. त्यांनी ही जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. अंबानी यांनी ही डील हातची जाऊ नये यासाठी खेळी खेळली. अमेरिकेची बाईआऊट फर्म अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट इंकसोबत त्यांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. अंबानी यांची निविदा मंजूर झाली तर भारताबाहेरील हा मोठा सौदा असेल . विशेष म्हणजे ब्रिटिश ब्रदर्स मुळचे गुजराती आहेत. त्यामुळे या सौद्याकडे उद्योग जगताचे लक्ष लागले आहे. त्यांनी सौदा हातचा जाऊ नये यासाठी मोठी बोली लावली आहे.

इस्सा ब्रदर्स गेल्या अनेक वर्षांपासून इतर कंपन्यांच्या अधिग्रहणावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. इस्सा ब्रदर्सने इंग्लंडमधील सुपरमार्केट ऑपरेटर Asda Group Ltd आणि फास्ट फूड रेस्टॉरेंट्स चेन Leon खरेदी केले. ईजी समूह हा इस्सा ब्रदर्स यांची मुख्य कंपनी आहे. या नवीन कंपन्यांच्या अधिग्रहणामुळे ईजी आता गॅस स्टेशन आणि डिपार्टमेंटल स्टोअरची मोठी चेन झाली आहे. बूट्स कंपनी खरेदी करण्यासाठी इस्सा ब्रदर्सने टीडीआर कॅपिटलसोबत हातमिळवणी केली आहे.

बूट्स ही किरकोळ औषधी विक्रीतील आघाडीची कंपनी आहे. वॉलग्रीन्स बूट्स अलायन्स या आंतरराष्ट्रीय कंपनीची बूटस ही मोठी शाखा आहे. वॉलग्रीन्सने बूट्ससाठी 850 कोटी डॉलरची किंमत लावली आहे. तर निविदाधारकांनी या कंपनीसाठी 500 कोटी पौंडची बोल लावली आहे. डॉलरमध्ये त्याची किंमत 604.77 इतकी आहे.

हे सुद्धा वाचा

वॉलग्रीन्स बोली वाढविण्यासाठी आग्रही आहे. बोलीची किंमत वाढविण्यासाठी कंपनीने जोर दिला आहे. बूट्सचे इंग्लंडमध्ये आजघडीला 2200 अधिक स्टोअर आहेत. या स्टोअरचा मेकओव्हर आणि दुरुस्तीची गरज आहे. तसेच बदलत्या युगाचा पॉसवर्डही या स्टोअर्सला आत्मसात करावा लागणार आहे.

मुकेश अंबानी हे सातत्याने त्यांच्या उद्योगाचा पसारा वाढवत आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होत आहे. नवनवीन उद्योग सुरु करत आहेत. गेल्या वर्षी 2022 मध्ये त्यांनी एकानंतर एक नवीन करार केला आहे. तर यावर्षीच्या सुरुवातीला 2023 मध्ये रिलायन्स उद्योग समूहाने (Reliance Industries Group) आणखी एक मोठी डील केलेली आहे. रिलायन्स समूहाच्या Reliance Retail ने पुन्हा एक नवीन उद्योग त्यांच्या ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे. गुजरातमधील 100 वर्ष जुनी बेवरेज कंपनी सोस्योचा (Sosyo) अर्धा हिस्सा रिलायन्स समूहाचा झाला आहे.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.