Vedanta Group : अनिल अग्रवाल यांचं 35000 कोटींचं साम्राज्य, वेदांता ग्रुपची जबाबदारी कोणावर?
वेदांता उद्योग समूहाचे प्रमुख अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे निधन झाले आहे. त्यानंतर आता वेदांता समूहाची धुरा कोणाकडे येणार? असे विचारले जात आहे.

Agnivesh Agarwal : देशातील दिग्गज उद्योगपती तथा वेदांता ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल (49) यांचे निधन झाले आहे. आपल्या मुलाचे निधन झाल्यानंतर आता अनिल अग्रवाल यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनिल अग्रवाल यांनी उभा केलेला वेदांता उद्योग समूह आज अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. अनिल अग्रहवाल आजघडीला कोट्यवधी रुपयांचे मालक आहेत. त्यामुळेच अग्निवेश अग्रवाल यांच्या निधनानंतर आता वेदांत ग्रुपाच उत्तराधिकारी कोण असणार? अनिल अग्रवाल यांनी उभे केलेले हे कोट्यवधीचे साम्राज्य कोण सांभाळणार, असे विचारले जात आहे.
1976 साली वेदांता रिसोर्सेसची स्थापना
सध्या अनिल अग्रवाल हे वेदांता रिसोर्सेसचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी 1976 साली वेदांता रिसोर्सेसची स्थापना केली केली होती. सुरुवातीला ही एक छोटी केबल कंपी होती. अनिल अग्रवाल यांनी खूपच कमी वयात आपल्या वडिलांसोबत उद्योग जगतात पाऊल ठेवले. वेदांता उद्योग समूह आज धातू, खान, उर्जा, इंधन या क्षेत्रात विस्तारला आहे.
अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबात कोण कोण आहे?
अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी किरण अग्रवाल आहे. त्या लाईमलाईटपासून दूर असतात. अनिल अग्रवाल यांना अग्निवेश अग्रवाल यांच्या रुपात एक मुलगा होता. तसेच त्यांना प्रिया अग्रवाल नावाची एक मुलगीही आहे. अग्निवेश अग्रवाल यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले.
अनिल अग्रवाल यांचा उत्तराधिकारी कोण?
अग्निवेश अग्रवाल यांच्या निधनानंतर आता प्रिया अग्रवाल यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे. त्या सध्या Vedanta आणि Hindustan Zinc या कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत. त्या हिंदुस्तान झिंक या कंपनीच्या प्रमुख आहेत. अनिल अग्रवाल हे खूप श्रीमंत आहेत. भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश होतो. फोर्ब्सच्या यादीनुसार अनिल अग्रवाल आणि त्यांच्या कुटंबाकडे एकूण 35 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. भविष्यात वेदांता ग्रुपची जबाबदारी प्रिया अग्रवाल यांच्याच खांद्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
