डी-मार्टमध्ये वस्तू स्वस्त का मिळतात? कसं आहे त्यांचं बिझनेस मॉडेल जाणून घ्या
डी-मार्ट स्टोअरची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे सर्वात कमी किंमतीत वस्तू मिळतात. कमी किंमतीत वस्तू विकूनही डी-मार्टचे मालक चांगला नफा कमवतात. कोरोनामध्ये देखील चांगली कमाई करणाऱ्या डी-मार्टचं बिझनेस मॉडेल काय आहे जाणून घेऊयात.

प्रत्येकाला नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करायची इच्छा असते. पण सुरुवात कुठून करावी हेच उमजत नाही. व्यवसाय करायला मोठं भांडवलं लागतं असा अनेकांचा गैरसमज आहे. पैसा लावल्यानंतर जर व्यवसाय चालला नाही तर काय होईल अशी भीती देखील अनेकांच्या मनात असते. त्यामुळेच अनेक जण व्यवसायात उतरण्याआधीच माघार घेतात. पण भारतात एका व्यक्तीने वयाच्या ४२ व्या वर्षी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनात त्यांना काय करायचं आहे हे स्पष्ट होतं. शेअर मार्केटमध्ये नफा कमवल्यानंतर हा व्यक्ती अचानक शेअर मार्केटमधून गायब झाला. लोकांनी त्याला वेड्यात काढलं. पण या व्यक्तीने तो कसा बरोबर होता हे आज सिद्ध केलंय. कोरोना काळात जेथे अनेक कंपन्यांना टाळं लागलं. अंबानी, अदानी यांना देखील मोठं नुकसान सहन करावं लागलं. पण याच काळात या कंपनीने चांगला नफा कमवला. ...