RBI ची मोठी आनंदवार्ता,तुमचा EMI कमी होणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे मोठे संकेत
RBI Loan EMI: कर्जदारांसाठी मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. वाहन अथवा गृहकर्जावरील हप्ता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मोठे संकेत दिले आहे. रुपयांची मोठी घसरण होत असतानाही हा विश्वास ग्राहकांना दिलासा देणार आहे.

Home Loan, Car Loan EMI Interest Rate Cut: भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. त्यानुसार पॉलिसी रेट कट होण्याची शक्यता आहे. म्हणजे रेपो रेटमध्ये कपात होईल. कर्जदारांसाठी ही मोठी आनंदवार्ता आहे. वाहन आणि गृहकर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता आहे. व्याजदरात मोठी कपात होण्याची शक्यता असल्याने कर्जावरील EMI कमी होईल आणि कर्जदारांच्या खिशावरील भार अजून कमी होईल. पण अनेक अर्थशास्त्रज्ञानुसार सध्या रुपयाची ऐतिहासिक घसरण सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत तर डॉलरच्या तुलने आतापर्यंतच्या सर्वात निच्चांकीस्तरावर रुपया जाण्याची भीती आहे. अशावेळी ईएमआय कमी होण्याची शक्यता अगदी दिवास्वप्न आहे. तरीही संजय मल्होत्रा यांच्या डोळस अभिप्रायामुळे कर्जदारच नाही तर रिअल इस्टेट आणि संबंधित सर्वच क्षेत्रांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
ईएमआय कमी होणार?
पतधोरण समितीच्या(MPC) 2025 च्या पहिल्या सहामाहीत व्याजदरात एकूण 100 आधार अंकांची कपात झाली. पण ऑगस्टमध्ये काही काळासाठी ती थांबविण्यात आली. त्याचवेळी भविष्यात व्याजदरात कपातीचे संकेत समितीच्या सदस्यांनी ही दिले होते. देशात महागाई कमी होत आहे. ऑक्टोबरच्या बैठकीतही याविषयीचे संकेत मिळाले होते. ऑक्टोबरमध्ये रेपो दरात कपात झाली नव्हती. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई 0.25 टक्क्यांच्या विक्रमी निच्चांकावर पोहचली होती. खाद्यान्न किंमतीत मोठी घसरण आणि कंझ्युमर गुड्सवर GST कपातीमुळे डिसेंबरमध्ये केंद्रीय बँकेच्या व्याजदरात कपातीचा रस्ता मोकळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
रुपयांचा निच्चांकी प्रवास
संजय मल्होत्रा यांच्या वक्तव्याचे पडसादही उमटले. भारताच्या 10-वर्षीय बेंचमार्क बाँड यील्डमध्ये घसरण आली. अर्थतज्ज्ञांच्या मते पुढील पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात मोठ्या कपातीचा आताच संदेश मिळाला आहे. मल्होत्रा यांनी सध्या रुपयाची घसरण ही स्वाभाविक असल्याचे आणि ती जागतिक बाजारातील घडामोडींवरील प्रतिक्रिया असल्याचे स्पष्ट केले. अर्थात चलनातील अस्थिरता कमी करण्यासाठी आरबीआयने यापूर्वी सुद्धा हस्तक्षेप केला आहे. रुपयात वार्षिक 3-3.5 टक्क्यांची घसरण ऐतिहासिक सरासरीशी मिळतीजुळती असल्याचे तज्त्रांचे मत आहे. पण डिसेंबर महिन्यात अजून व्याजदर कमी झाले तर ग्राहकांवरील मोठा बोजा कमी होईल. त्यांच्या हातात पैसा खुळखुळेल आणि त्यांची क्रशक्ती, पर्जेसिंग पॉवर वाढेल. त्यामुळे बाजारात पुन्हा पैसा खेळता राहील. तर यामुळे बचतीचा आकडा सुद्धा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.