AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : कच्चा तेलाच्या स्वस्ताईचा हंगाम, पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या?

Petrol Diesel Rate Today : कच्चा तेलात सध्या स्वस्ताई आहे. गेल्या काही दिवसांपासून किंमती घसरणीवर आहे. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का?

Petrol Diesel Rate Today : कच्चा तेलाच्या स्वस्ताईचा हंगाम, पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या?
पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय
| Updated on: Jun 14, 2023 | 8:39 AM
Share

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलात सध्या स्वस्ताईचा हंगाम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून किंमती घसरणीवर आहेत. गेल्या पाच महिन्यात किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आहेत. आज कच्चा तेलातील घसरण कायम आहे. 14 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 74.06 डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल 69.17 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव (Crude Oil Price) हे गेल्या 15 महिन्यातील निच्चांकीस्तरावर आहेत. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल स्वस्त (Petrol Diesel Price) झाले का?

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते. केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.96 तर डिझेल 93.46 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.72 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.48 तर डिझेल 93.97 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.98 पेट्रोल आणि डिझेल 95.94 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.89 आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.25 आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.27 तर डिझेल 92.81 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.69 तर डिझेल 94.18 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.73 आणि डिझेल 93.22 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.49 रुपये तर डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 105.97 रुपये तर डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच