Car Loan : कार खरेदीचा आनंद दुप्पट, महिलेच्या नावावर वाहन कर्ज घेतल्यास फायदा काय?

Women Car Loan Schemes : गृहकर्ज महिलेच्या नावे घेतल्यावर व्याजदरात कपात अथवा प्रक्रिया शुल्क माफ, कमी व्याजदर असा फायदा मिळतो. असाच फायदा वाहन कर्ज घेताना महिलांना देण्यात येतो का? काय होतो फायदा?

Car Loan : कार खरेदीचा आनंद दुप्पट, महिलेच्या नावावर वाहन कर्ज घेतल्यास फायदा काय?
महिलांची कार खरेदी, एकदम फायदेशीर
| Updated on: Nov 19, 2025 | 4:23 PM

Car Loan Schemes for Women : अनेकदा आपण सोशल मीडियावर स्क्रोल करताना जाहिराती समोर येतात. महिलेच्या नावावर वाहन कर्ज घेतल्यास तुम्हाला अनेक लाभ मिळतील अशी जाहिरात दिसते. पण अनेकदा आपला त्यावर विश्वास नसतो. गृहकर्ज महिलेच्या नावावर घेतल्यास आपल्याला मोठा फायदा होतो. कर्जाच्या व्याजदर कमी असतो. प्रक्रिया शुल्क माफ होते, मुद्रांक शुल्कात कपात होते अथवा इतर अनेक फायदे होतात. तसेच महिलेच्या नावावर कार कर्ज घेतल्यास अनेक फायदे होतात, या दाव्यात किती आहे तथ्य?

कर्ज केव्हा मिळेल?

महिलांच्या नावावर कर्ज घेत असाल तर तिच्या उत्पन्नाचा स्त्रोत दाखवावा लागेल. म्हणजे कर्जदार महिला नोकरी करते, व्यवसाय करते याबाबतचा उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागेल. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना वाहन कर्ज मिळू शकते. तर या महिलेचा सिबिल स्कोअर सुद्धा चांगला असावा. तसेच तीने यापूर्वी कोणतेही कर्ज थकवलेले नसावे. तिच्याकडे उत्पनाशीसंबंधित योग्य ती कागदपत्र असावीत.

प्रक्रिया शुल्क माफ

कार्ज घेताना प्रक्रिया शुल्क द्यावे लागते. अनेकदा वाहन कर्ज घेण्यासाठी प्रक्रिया शुल्क हे 1000 ते 3,000 रुपयांच्या घरात असू शकते. पण महिलांसाठी हे प्रक्रिया शुल्क माफ करण्यात येते. संबंधित वाहन डीलर तुम्हाला याविषयी माहिती देईल. तर काही बँका महिलांकडून कोणताही आगाऊ ईएमआय सुद्धा घेत नाहीत. तर कर्जावरही चांगल्या ऑफर असतात.

व्याजदरही कमी

महिलांसाठी वाहन कर्जाचा दर पुरुषांपेक्षा अनेकदा कमी असतो. बँकेकडे याविषयची विचारणा केल्यावर माहिती मिळते. कार योजनांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी व्याजदर हा आहे. अनेक बँका पुरुषांपेक्षा महिलांना वाहन कर्ज घेताना व्याजदरात काही ना काही सूट देतात. ही सवलत 0.50 टक्के, 0.40 टक्के अथवा एक टक्क्यांपर्यंत मिळते. म्हणजे पुरुषांपेक्षा व्याजदर कमी असतो. तर महिलांचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर काही सवलतीही मिळतात.

काही कार कर्ज प्रक्रिया शुल्कावर सवलत मिळते, कमी विमा प्रीमियम आणि महिलांसाठी इतर सवलती देण्याते येतात. त्याविषयीची माहिती कार विक्रेता आणि बँकेकडे घ्या. एकाच बँकेकडे न जाता दोन-तीन बँकेकडून कोटेशन घ्या. म्हणजे काही बँका अधिकचा फायदा देतील. कार घेण्याचा निर्णय झाल्यावर आणि कागदपत्रे असतील तर कर्ज मंजुरीची प्रक्रिया पण जलद होते. त्यामुळे वाहन घेताना जर घरातील कमवत्या महिलेच्या नावावर घेतले तर अनेक फायदे होतात. व्याजदर स्वस्त असतो. प्रक्रिया शुल्क वाचू शकते. विमा सवलत मिळते. बोनस पॉईंटसह इतर लाभ होतात.