Gold And Silver Rate: सोने-चांदीत दरवाढीचे ‘इनकमिंग’; किंमतीत तुफान, ग्राहकांमध्ये मोठी नाराजी
Gold And Silver Price Today: सोने आणि चांदीने पुन्हा उसळी घेतली आहे. सध्या नगरपालिका निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. त्यातच सोने-चांदीतही मोठी उसळी दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Gold And Silver Price Jalgaon Market: सोने आणि चांदीने पुन्हा उसळी घेतली आहे. जळगावच्या सराफा बाजारात दोन्ही धातुमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरवाढीचे इनकमिंग सुरूच असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत चढउतार दिसत होता. आता दोन्ही धातूत बुधवारी मोठी उसळी दिसून आली. वायदे बाजारातही किंमतीत वाढ दिसत आहे. वर्षाअखेर दोन्ही धातुत मोठी वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
बुधवारी किंमतीत तुफान
देशात आज 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. जोरदार मागणी आणि अमेरिकन मध्यवर्ती बँकेकडून डिसेंबर महिन्यात पुन्हा व्याजदर कपातीची शक्यता असल्याने बुधवारी दोन्ही धातुत मोठी उसळी आली. वायदे बाजारात MCX, सोने 5 डिसेंबरसाठीच्या सौद्या जवळपास 300 रुपयांनी वधारून 1,22,960 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या इंट्राडे उच्चांकावर पोहचला. एमसीएक्स चांदी 5 डिसेंबरच्या सौद्यात जवळपास 900 रुपयांची उसळी येऊन 1,55,568 रुपये प्रति किलोग्राम इंट्राडे उच्चांकावर पोहचला आहे.
सोने-चांदीची मोठी उसळी
जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने मोठी उसळी घेतल्याचे दिसून आले. सोन्याचे भाव 1 हजार 545 रुपयाने वाढले तर चांदी 4 हजार 120 रुपयाने महाग झाली. आज सोन्याचा दर 1 लाख 26 हजार 690 रुपये इतका आहे. तर चांदीचा भाव जीएसटीसह एक लाख 62 हजार 740 रुपये आहे. दिवाळीनंतर दोन्ही धातुत स्वस्ताई आली होती. पण आता भाव पुन्हा वधारले आहेत.
हॉलमार्कचे गणित जाणून घ्या
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.
