अग्निवीर लेखी परीक्षेसाठी इंडियन आर्मीने जारी केले सँपल पेपर, असे डाऊन लोड करा

अग्निवीर भरतीच्या तयारी करीत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. इंडियन आर्मीने अग्निवीर भरतीसाठी रिटर्न एक्झामसाठी सँपल पेपर अपलोड केले आहेत. हे पेपर फ्रिमध्ये अपलोड करता येणार आहे.

अग्निवीर लेखी परीक्षेसाठी इंडियन आर्मीने जारी केले सँपल पेपर, असे डाऊन लोड करा
| Updated on: Apr 09, 2026 | 8:49 PM

भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून भरती होणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आली आहे. इंडियन आर्मीने १० पर्यंत नवीन भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. आतापर्यंत मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मात्र, या पदासाठी आधी लेखी परीक्षा पास व्हावी लागणार आहे. अग्निवीर भरतीसाठी आलेले कठीण प्रश्न उमेदवारांना कोड्यात टाकू शकतात. त्यामुळे उमेदवारांसाठी इंडियन आर्मीने सँपल पेपर जारी केले आहे. हे पेपर वेबसाईटवरुन मोफत डाऊन लोड करता येत आहेत.

अग्निवीर भरतीच्या लेखी परीक्षेच्या सँपल पेपर संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. हे  नमूना  पेपर वेबसाईटवर जारी केले आहेत. हे पेपर कसे डाऊनलोड करायचे याची माहिती येथे देण्यात आले आहेत.

अग्निवीर भरती ट्रेडवाईस नमूना पेपर जारी

इंडियन आर्मीने अग्निवीर भरती लेखी परीक्षेसाठी ट्रेड वाईज सँपल पेपर जारी केले आहेत. ज्या अंतर्गत इंडियन आर्मीने अग्निवीर भरती सह अन्य भरतींसाठी एकूण ४५ सँपल पेपर अपलोड केले आहे. इंडियन आर्मीच्या वतीने अग्निवीर भरती लेखी परिक्षेसाठी अग्निवीर जनरल ड्युटी (GD), टेक्निकल असिस्टन्ट, स्टोअर किपर ट्रेड्समन, अग्निवीर जीडी (महिला मिलिट्री पोलिस),सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टन्ट, जेसीओ आरटी पंडीत/ग्रंथी/मौलवी/केटरिंग/पादरी/बुद्धिस्ट, हवालदार एज्युकेश ( आयटी आणि सायबर ) ट्रेडचे सँपल पेपर जारी केले आहेत.

सँपल पेपर फ्रीमध्ये असे करा डाऊनलोड –

जर एखाद्या उमेदवाराला अग्निवीर भरती लेखी परीक्षेसाठी मोफत सँपल पेपर डाऊनलोड करु इच्छीत आहे तर ही सुविधा उपलब्ध आहे. चला पाहूयात कसे फ्री सँपल पेपर डाऊनलोड केले जाऊ शकतात.

सर्वात आधी इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in जावे

होमपेजवर JCO/OR/Agniveer Enrolment वाल्या सेक्शनलर दिसणाऱ्या What’s New टॅबवर क्लिक करावे

डाव्याबाजूला अग्निपथ रॅली नोटिफिकेशनच्या खाली दिसणाऱ्या Sample Question Paper वर क्लिक करावे.

येथे ट्रेडनुसार सँपल पेपर दिसतील. आपल्या ट्रेडच्या सँपल पेपरवर क्लिक करुन सबमिट करावे

आपल्या ट्रेडच्या सँपल पेपरच्या पीडीएफला डाऊनलोड करावे

यानंतर उमेदवार https://share.google/aMCL0QFKz0t6bb0rW लिंकवर क्लिक करुन थेट जाऊन सँपल पेपर डाऊनलोड करु शकतात.

येथे पाहा पोस्ट –

सँपल पेपर सोडवल्यास १०० टक्के यश

इंडियन आर्मी डीजी रिक्रुटिंग लेफ्टनंट जनरल अनूप सिंघल (AVSM, SM)यांची एक व्हिडीओ मुलाखत व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात की या वर्षी आम्ही ३० सँपल पेपर्स अपलोड करणार आहोत. तसेच गॅरंटी देत आहोत की जे कँडिडेट्स सँपल पेपर संपूर्ण पणे सोडवतील तो लेखी परीक्षेत पास होऊन जाईल.

 

Follow Us