AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AIL Recruitment 2021: एयर इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर भरती, अर्ज कसा करायचा?

एअर इंडिया लिमिटेडद्वारे सहाय्यक मॅनेजर आणि स्टेशन मॅनेजर पदावर भरती करण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरी तारीख जवळ आल्यानं उमेदवारांनी तातडीनं अर्ज दाखल करण आवश्यक आहे.

AIL Recruitment 2021: एयर इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर भरती, अर्ज कसा करायचा?
एअर इंडिया
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 16, 2021 | 10:28 AM
Share

AIL Recruitment 2021नवी दिल्ली: एअर इंडिया लिमिटेडमध्ये असिस्टंट मॅनेजर आणि स्टेशन मॅनेजर पदांवर भरती प्रक्रिया आयोजित केली होती. एअर इंडिया लिमिटेडनं जारी केलेल्या माहितीनुसार एकूण 30 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी अधिकृत वेबसाईट airidia.in ला भेट देणं आवश्यक आहे.

एअर इंडिया लिमिटेडद्वारे सहाय्यक मॅनेजर आणि स्टेशन मॅनेजर पदावर भरती करण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरी तारीख जवळ आल्यानं उमेदवारांनी तातडीनं अर्ज दाखल करण आवश्यक आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर वेबसाईटवरुन लिंक हटवली जाणार आहे.

या पदांवर भरती

बीपीओ टीम लीडर – 1 पद व्यवस्थापक (व्यापार विक्री) – 1 पद अधिकारी/ AM विक्री (विक्री समर्थन आणि बाजार विश्लेषक) – 1 पद अधिकारी/ AM (ग्राहक तक्रार) -1 पद सहाय्यक व्यवस्थापक / उपव्यवस्थापक / व्यवस्थापक – 5 पदे स्टेशन मॅनेजर (उर्वरित भारत) – 14 पदे AGM (IOCC) – 1 पद आयटी हेड – 1 पद एजीएम (वैद्यकीय सेवा) – 1 पद वरिष्ठ पर्यवेक्षक (वैद्यकीय) – 1 पद ग्राउंड इंस्ट्रक्टर (तांत्रिक/कामगिरी) – 3 पदे

पात्रता

बीपीओ टीम लीडर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला कॉल सेंटरमध्ये दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा. त्याचबरोबर आयटी प्रमुख पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक किंवा MCA पदवी असणे आवश्यक आहे. एजीएम (वैद्यकीय सेवा) पदासाठी, उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?

एअर इंडियामधील रिक्त पदांवर अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करावा. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरील अधिसूचनेसह दिलेला अर्ज डाउनलोड करावा लागेल. अर्जातील माहिती भरून अलायन्स एअर, कार्मिक विभाग, अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल -1, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली-110037 वर स्पीड पोस्टाद्वारे पाठवणं आवश्यक असेल.

निवड प्रक्रिया

मुलाखत प्रक्रियेद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी एअर इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय.

इतर बातम्या:

UPSC Exam Calendar: यूपीएससीकडून 2022 च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, ‘इथे’ पाहा परीक्षांच्या तारखा

CRPF Recruitment 2021: सीआरपीएफमध्ये पॅरामेडिकल स्टाफची मोठी भरती, 2439 पदांवर थेट भरती

AIL Recruitment 2021 Vacancy for Assistant Manager and various Post in Air India Limited

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?