IIT, IIM, NIT, IIIT काहीच नाही तरीही रचला इतिहास! विक्रमी पगार, कुणालाही न मिळालेलं पॅकेज, भेटा आराध्या त्रिपाठीला
Google Jobs: आराध्या त्रिपाठी ने MMMUT मधून Computer Engineering मध्ये बीटेक केलंय. आराध्या त्रिपाठीला मिळालेले पॅकेज हे MMMUT मध्ये मिळालेले आत्तापर्यंतचे सर्वाधिक पॅकेज आहे. आराध्या त्रिपाठी यांना गुगलमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून प्लेसमेंट मिळाली आहे.

मुंबई: गुगलच्या नोकरीचं सगळ्यांना आकर्षण असतं. गुगल सारख्या कंपन्यांचे पगार आपल्या विचारांचाही पलीकडे असतात. बीटेक इंजिनिअरिंग केलेल्या उत्तर प्रदेशच्या आराध्या त्रिपाठीने सॅलरी पॅकेजचा अक्षरशः इतिहास रचलाय. तिला गुगलकडून नोकरीची ऑफर देण्यात आलीये जिचा पगार विक्रमी आहे. सध्या आराध्या त्रिपाठी ही तिच्या MMMUT युनिव्हर्सिटीमधली सगळ्यात जास्त पॅकेज घेणारी विद्यार्थिनी आहे. ती खूप चर्चेत आहे. आराध्याला गुगलमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून प्लेसमेंट मिळालेली आहे. काय वाटतं विक्रमी पॅकेज म्हणजे किती पॅकेज असेल? किती पगार असेल ज्याने आराध्याने युनिव्हर्सिटीमध्ये इतिहास रचलाय.
आराध्या त्रिपाठी ही मदन मोहन मालवीया युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या (Mohan Malaviya University of Technology MMMUT) मध्ये शिकते. आराध्या त्रिपाठी हिला गुगलकडून नोकरीची ऑफर आलीये. तिला अमेरिकन टेक जायंटकडून 52 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. आराध्या त्रिपाठी ने MMMUT मधून Computer Engineering मध्ये बीटेक केलंय. आराध्या त्रिपाठीला मिळालेले पॅकेज हे MMMUT मध्ये मिळालेले आत्तापर्यंतचे सर्वाधिक पॅकेज आहे. आराध्या त्रिपाठी यांना गुगलमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून प्लेसमेंट मिळाली आहे.
आराध्या त्रिपाठी ही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तिचे वडील अंजनी नंदन त्रिपाठी हे गोरखपूरच्या सिव्हिल कोर्टात वकील आहेत, तर आई गृहिणी आहे. आराध्या त्रिपाठी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. शालेय शिक्षणानंतर आराध्या त्रिपाठी MMMUT मध्ये बीटेक करण्यासाठी गेली.
आराध्या त्रिपाठीने स्केलर अकॅडमी मधून इंटर्नशिप केलीये या इंटर्नशिप नंतर तिला स्केलरकडून 32 लाख रुपयांचे पॅकेज ऑफर करण्यात आले होते, पण आता तिला गुगलकडून चांगली ऑफर मिळाली आहे.
