‘या’ बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ‘ही’ पदे जाणार भरली, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही तास

Bank Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी आहे. आता बँकेत नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

'या' बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 'ही' पदे जाणार भरली, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही तास
job
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 2:16 PM

अनेकांचे बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता ते स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. होय तुम्ही खरे ऐकले. बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. थेट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून तब्बल 3 हजार पदे भरली जाणार आहेत. शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वाढून देण्यात आली. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अर्ज करण्याची परत एकदा संधी मिळाली आहे. आता या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघा एकच दिवस शिल्लक राहिला आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 जून 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. nats.education.gov.in या साईटवर जाऊन उमेदवारांना अर्ज करावी लागतील. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारासाठी पार पडत आहे. यासोबतच वयाची अटही भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये. नुकताच पदवी घेतलेले उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून गेल्या काही दिवसांपासून अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. यासोबत सध्या बँक ऑफ बडोदामध्येही भरती प्रक्रिया सुरू आहे. बँक ऑफ बडोदाच्या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला बँकेच्या साईटवर मिळेल.

Non Stop LIVE Update
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय.
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य.
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका.
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’.
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?.
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक.
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका.
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा.
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं.