बँकेत नोकरी करण्याची संधी, पात्रता काय, पगार किती? वाचा…
बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बँक ऑफिसर (LBO) या पदांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करु शकता.

बँकिंग परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बँक ऑफिसर (LBO) या पदांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करु शकता. लोकल बँक ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2025 आहे, त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वयोमर्यादा किती?
बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बँक ऑफिसरच्या 2500 पदांची भरती केली जात आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे. सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी 850 रुपये फी असेल, तर SC, ST, PwD, ESM आणि महिला उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही विषयात पदवीधर असले पाहिजेत. चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट पात्रता असलेले उमेदवार देखील पात्र आहेत. तसेच बँकेत काम करण्याचा एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
पगार किती मिळणार?
बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बँक ऑफिसरपदी निवड झालेल्या उमेदवारांना 48,480 ते 85,920 मानधन मिळेल.
अर्ज कसा करायचा?
- या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- त्यानंतर होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.
- उमेदवारांसमोर एक नवीन पेज उघडेल, जिथे Opportunities वर क्लिक करा.
- त्यानंतर भरती संबंधित लिंकवर क्लिक करा.
- पुन्हा एक नवी विंडो उघडेल, जिथे स्वतःचे रजिस्ट्रेशन करा.
- त्यानंतर अर्ज भरण्याचा पर्याय मिळेल.
- अर्ज भरल्यानंतर, तो सबमिट करा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर, तो डाउनलोड करा.
- शेवटी अर्जाची प्रिंटआउट घ्या.
