वेळ अजूनही गेली नाही… बँक ऑफ बडोदात नोकरीसाठी अर्ज करण्याची वेळ वाढली; त्वरीत फॉर्म भरा

बँक ऑफ बडोदाने 518 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. IT, ट्रेड अँड फॉरेक्स, रिस्क मॅनेजमेंट आणि सिक्युरिटीज यासारख्या विविध विभागांमध्ये ही पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पात्रता आणि वयाची मर्यादा वेगवेगळ्या पदांसाठी वेगळी आहे.

वेळ अजूनही गेली नाही... बँक ऑफ बडोदात नोकरीसाठी अर्ज करण्याची वेळ वाढली; त्वरीत फॉर्म भरा
बँक ऑफ बडोदा
| Edited By: | Updated on: Mar 18, 2025 | 4:29 PM

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. बँक ऑफ बडोदाच्या विविध विभागांमध्ये पदे रिक्त आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या नियुक्ती प्रक्रियेत 500 पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहेत. प्राथमिक अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025 होती, आता अर्ज भरण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक असाल, तर 21 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत.

पदांची माहिती: एकूण पदे – 518

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) – 350 पदे

ट्रेड अँड फॉरेक्स (Trade & Forex) – 97 पदे

रिस्क मॅनेजमेंट (Risk Management) – 35 पदे

सिक्युरिटीज (Securities) – 36 पदे

अर्ज शुल्क :

साधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 600 रुपये असणार आहे. याउलट, राखीव श्रेणीतील उमेदवार 100 रुपये शुल्क भरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पात्रता :

विभिन्न पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, ज्यात बीई/बीटेक/एमटेक/एमसीए, सीए, एमबीए, पदव्युत्तर इत्यादी समाविष्ट आहेत. अधिक माहितीसाठी, तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.

वयाची अट :

प्रत्येक पदासाठी वयाची मर्यादा वेगळी असू शकते. उमेदवाराचे वय 22 ते 37 वर्षे असावे.

अर्ज भरण्याची प्रक्रिया :

सर्वप्रथम, बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in ला भेट द्या.

होमपेजवरील “Career” टॅबवर क्लिक करा आणि “Current Opportunity” वर क्लिक करा.

अर्ज लिंकवर क्लिक करा.

अर्जासाठी आवश्यक माहिती भरा.

अर्ज शुल्क भरा.

सबमिट करा.

निवड प्रक्रिया :

या पदांसाठी निवड प्रक्रियेत ऑनलाईन परीक्षा, सायकोमेट्रिक टेस्ट किंवा बँकेने आयोजित केलेल्या इतर कोणत्याही परीक्षा समाविष्ट असू शकतात. ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहतील. अर्जांची संख्या वाढल्यास किंवा कमी झाल्यास बँक ऑफ बडोदा शॉर्टलिस्टिंग निकष किंवा मुलाखतीची प्रक्रिया बदलू शकते. बँक निवडीसाठी विविध पर्यायी परीक्षा, वर्णनात्मक परीक्षा, मानसिक मूल्यांकन, मुलाखत घेऊ शकते.