बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची संधी, 57 हजार मिळू शकतो पगार, असा करा अर्ज…

| Updated on: Jun 14, 2021 | 1:22 PM

बँकेत नोकरी इच्छिणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांना सिक्कीम स्टेट बँकमध्ये अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे. (bank Of Sikkim recruitment bank Assistant manager Post how to apply)

बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची संधी, 57 हजार मिळू शकतो पगार, असा करा अर्ज...
बँकेत नोकरी करण्याची संधी
Follow us on

मुंबई : बँकेत नोकरी इच्छिणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांना सिक्कीम स्टेट बँकमध्ये अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ सिक्कीमने सहाय्यक व्यवस्थापक पदावर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट statebankofsikkim.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. (bank Of Sikkim recruitment bank Assistant manager Post how to apply)

पदांची संख्या किती?

स्टेट बँक ऑफ सिक्कीममध्ये या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापकाची एकूण 26 पदे नेमणूक केली जातील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 01 जून 2021 पासून सुरु झालेली आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

स्टेट बँक ऑफ सिक्कीममधील असिस्टंट मॅनेजरच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र, लेखा, वाणिज्य, वित्त व्यवस्थापन विषयांत पदवी असणे आवश्यक आहे. यासह, सिक्कीम राज्याच्या भाषेचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.

वय मर्यादा किती?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे आहे.

निवड प्रक्रिया

पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

पगार किती?

सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 39,100 ते 57,367 रुपये पगार देण्यात येईल. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करु शकता

(bank Of Sikkim recruitment bank Assistant manager Post how to apply)

हे ही वाचा :

Job News: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये अ‍ॅप्रेंटिसशिपची संधी

Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात SSC अधिकारी पदावर संधी, पगार 1 लाख 10 हजारांपर्यंत, असा अर्ज करा…

Recruitment 2021 : नोकरीच्या प्रतीक्षेत आहात? तयार रहा, यंदा बंपर भरती!