BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 पदांवर संधी, अर्ज करण्याची शेवटची संधी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ने प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) आणि प्रकल्प अभियंता (प्रोजेक्ट इंजिनिअर) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. एकूण 511 पदांवर भरती प्रकिया राबवली जणार आहे.

BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 पदांवर संधी, अर्ज करण्याची शेवटची संधी
भारत इलेक्ट्रॉनिक्स भरती

BEL Recruitment 2021 नवी दिल्ली: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ने प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) आणि प्रकल्प अभियंता (प्रोजेक्ट इंजिनिअर) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. एकूण 511 पदांवर भरती प्रकिया राबवली जणार आहे. पात्र उमेदवार BEL च्या अधिकृत वेबसाईट bel-india.in द्वारे अर्ज दाखल करू शकतात. अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आज असून अर्ज उमदेवारांनी अर्ज दाखळ करणं आवश्यक आहे.

पदांची संख्या

प्रशिक्षणार्थी अभियंता (I) – 308
प्रकल्प अभियंता (I) – 203

शैक्षणिक पात्रता

प्रोजेक्ट इंजिनिअर आणि ट्रेनी इंजिनअर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे चार वर्षांची अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी शाखेतील इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिल अँड इलेक्ट्रॉनिक्स या विषयातून पदवी उत्तीर्ण असणारे अर्ज दाखल करु शकतात.

वयोमर्यादा

प्रोजेक्ट इंजिनिअर आणि ट्रेनी इंजिनअर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असावे. त्याचबरोबर वयोमर्यादेमध्ये ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षे आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया:

प्रोजेक्ट इंजिनिअर आणि ट्रेनी इंजिनअर या पदांसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.

अर्ज शुल्क:

सामान्य श्रेणी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. त्याचबरोबर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 200 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

मानधन

ट्रेनी उमदेवारांना पहिल्या वर्षी 25 हजार, दुसऱ्या वर्षी 28 हजार आणि तिसऱ्या वर्षी 31 हजार मानधन दिलं जाईल. याशिवाय प्रोजेक्ट इंजिनिअर पदी निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी 35 हजार, दुसऱ्या वर्षी 40 हजार, तिसऱ्या वर्षी 45 हजार तर चौथ्या वर्षी 50 हजार रुपये मानधन दिलं जाईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख-15 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाइट-bel-india.in

इतर बातम्या:

Railway Recruitment 2021: ना परीक्षा ना मुलाखत, थेट दहावीच्या गुणांवर निवड, रेल्वेत अप्रेटिंसची संधी

UPSC Recruitment 2021: यूपीएससीतर्फे ESIC मध्ये 151 पदांची भरती, पदवीधरांना मोठी संधी

IOCL Recruitment 2021: इंडियन ऑईलच्या 480 प्रशिक्षणार्थी पदांसाठी रिक्त जागांवर भरती, परीक्षेद्वारे मिळवा नोकरी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI