AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई उच्च न्यायालयाकडून मेगा भरती, 4 हजारहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, लगेचच करा अर्ज

मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठी बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट न्यायालयात नोकरी करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावा.

मुंबई उच्च न्यायालयाकडून मेगा भरती, 4 हजारहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, लगेचच करा अर्ज
| Updated on: Dec 13, 2023 | 7:32 AM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी बातमी आहे. थेट न्यायालयात नोकरी करण्याची तुमच्याकडे मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. भरती प्रक्रियाला सुरूवात झाली असून इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेबद्दल नुकताच अधिसूचना ही जाहीर करण्यात आलीये. स्टेनोग्राफर ग्रेड 3, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई यापदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालयांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड 3, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदांसाठीच्या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहीर केलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज हे दाखल करावे लागतील. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेची सर्व माहिती आणि अर्ज करण्यासाठी bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल. तिथूनच या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 4629 पदांसाठी पार पडत आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता फटाफट या भरतीसाठी अर्ज करावेत.

भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना वयाची अट ही ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 आणि जास्तीत जास्त 38 असावे. यामध्ये काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आलीये. कनिष्ठ लिपिक एकून पदसंख्या 2795, स्टेनोग्राफर ग्रेड 3 एकून पदसंख्या 568, शिपाई एकून पदसंख्या 1266 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

याप्रमाणे 4629 पदे ही भरली जातील. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदांनुसार असणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला bombayhighcourt.nic.in या साईटवरच मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज दाखल करावे लागतील.

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा