AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CA Final Result 2022: ICAI CA 2022 चा निकाल लागला! असा करा निकाल डाउनलोड

CA Final Result 2022: शुक्रवार, 15 जुलै 2022 रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे अहवालात सुचविण्यात आले होते. आता, आयसीएआय सीए फायनल मे निकाल 2022 सर्वांसाठी icai.nic.in वर जाहीर करण्यात आला आहे.

CA Final Result 2022: ICAI CA 2022 चा निकाल लागला! असा करा निकाल डाउनलोड
CA Final Result 2022Image Credit source: Official Website
| Updated on: Jul 15, 2022 | 12:38 PM
Share

CA Final Result 2022: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) शुक्रवारी, आज सीए फायनल रिझल्ट २०२२ च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. मे महिन्यात परीक्षा झाली होती. उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून आपला निकाल डाउनलोड (How To Download Result CA) करू शकतात. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI CA Final Results 2022) आयसीएआय सीए फायनल रिझल्ट 2022 साठी अधिकृत जाहीर केलेली तारीख जाहीर केली नसली, तरी शुक्रवार, 15 जुलै 2022 रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे अहवालात सुचविण्यात आले होते. आता, आयसीएआय सीए फायनल मे निकाल 2022 सर्वांसाठी icai.nic.in वर जाहीर करण्यात आला आहे.

असा चेक करा रिझल्ट

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या – icai.nic.in 
  2. होमपेजवर उपलब्ध असलेल्या ‘आयसीएआय सीए फायनल मे रिझल्ट्स २०२२’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. लॉग-इन तपशील योग्यरित्या प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा.
  4. आयसीएआय सीए फायनल रिझल्ट 2022 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  5. निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी जतन करा.

श्री. धीरज खंडेलवाल यांच्याकडून अभिनंदन!

आयसीएआय सीसीएम, श्री. धीरज खंडेलवाल यांनीही एक ट्विट लिहून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.”जे विद्यार्थी सीए झालेले आहेत अशा सर्वांचं अभिनंदन!” अशा आशयाचं एक ट्विट त्यांनी केलंय.

 14 मे ते 29 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली परीक्षा

आयसीएआय सीए फायनल मे परीक्षा 2022 अधिकृतपणे 14 मे ते 29 मे 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. देशभरातील विविध केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. आता, उमेदवार त्यांचे गुण तपासू शकतात आणि त्यांनी कशी कामगिरी केली हे पाहू शकतात कारण इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) मे सत्रासाठी आयसीएआय सीए अंतिम निकाल 2022 जाहीर केला आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.