Carrier : डिग्री नसतांनाही या क्षेत्रात आहे कमाईची चांगली संधी, स्टार्टअपमध्येही आहे नोकरीची संधी

अशा काही क्षेत्रांबद्दल जाणून घेऊया, जिथे तुम्ही कोणत्याही पदवीशिवाय चांगली नोकरी मिळवू शकता किंवा तुमची स्वतःची स्टार्टअप कल्पना सुरू करू शकता.

Carrier : डिग्री नसतांनाही या क्षेत्रात आहे कमाईची चांगली संधी, स्टार्टअपमध्येही आहे नोकरीची संधी
स्टार्ट अपImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 3:14 PM

मुंबई : देशात स्टार्टअपची व्याप्ती वाढत आहे (Start up). नोकरी मिळवण्यासाठी उमेदवार मोठमोठ्या विद्यापीठांमधून किंवा संस्थेतून महागडे कोर्सेस करतात. मार्केटची गरज पाहता आता भरपूर जॉब ओरिएंटेड कोर्सेसही पाहायला मिळत आहेत. बऱ्याच जणांकडे डिग्री नसल्याने त्यांना करियर (Carrier) विषयी चिंता असते, मात्र असे काही क्षेत्र आहेत ज्यात करियर करण्यासाठी डिग्रीची गरज नाही. इतकेच काय तर त्यांना स्टार्टअप मध्येही चांगली संधी उपलब्ध आहे. अशी अनेक क्षेत्रे आहेत, जिथे नोकरी शैक्षणिक पदवी आवश्यक नाही, तर मिळवण्यासाठी टॅलेंटची गरज आहे. येथे एखाद्याच्या मेहनतीनुसार आणि आवडीनुसार करिअर करता येते. अशा काही क्षेत्रांबद्दल जाणून घेऊया, जिथे तुम्ही कोणत्याही पदवीशिवाय चांगली नोकरी मिळवू शकता किंवा तुमची स्वतःची स्टार्टअप कल्पना सुरू करू शकता.

वेब डेव्हलपर

सध्याचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. डिजिटल युगातील जॉब मार्केटमध्ये वेब डेव्हलपर्सना खूप मागणी आहे. वेब डेव्हलपर होण्यासाठी वेबसाइट्स आणि इंटरनेटचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पदवीशिवायही या क्षेत्रात करिअर करू शकता आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही  कोर्सही करू शकता. आता तर YouTube वरूनही कोडींग शिकणे शक्य आहे.

सोशल मीडिया एक्सपर्ट

सोशल मीडिया हे आता रोजगाराभिमुख व्यासपीठ बनले आहे. तुमच्याकडे पदवी नसेल पण सोशल मीडियाशी संबंधित गोष्टी माहित असतील तर तुम्ही त्यात करिअर करू शकता. आजकाल सोशल मीडिया एक्सपर्टची खूप मागणी आहे. अनेक कंपन्यांना वेळोवेळी सोशल मीडिया तज्ञांचे मत आवश्यक असते. सोशल मीडियाच्या कोणत्याही फोरममध्ये तुमचे करिअर सुरू करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट आणि सोशल मीडिया ट्रेंडचे चांगले ज्ञान असले पाहिजे.

हे सुद्धा वाचा

फ्रीलान्स फोटोग्राफर

फोटोग्राफीचा छंद तुमचे भविष्य ठरवू शकतो. वेबसाइट्स, सोशल मीडिया फोरम, ट्रॅव्हल पोर्टल, फॅशन इंडस्ट्री आणि खाजगी कंपन्या किंवा सरकारी विभागांमध्ये फोटोग्राफी प्रकल्प घेऊन तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. तुम्ही तुमचे फोटो ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे कंपन्यांना विकू शकता.

फिटनेस ट्रेनर

आजकाल लोकं त्यांच्या फिटनेसबद्दल खूप गंभीर आहेत. कोणत्याही पदवीशिवाय किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरही या व्यवसायात करिअर सुरू करता येते. लोकं आरोग्याबाबत जागरूक असल्याने या क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी आहे. आजकाल विविध कंपन्या आणि सरकारी विभागही फिटनेस प्रशिक्षकांची नेमणूक करतात. याशिवाय, लोकं वैयक्तिक फिटनेस ट्रेनर देखील नियुक्त करतात.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.