Central Bank of India Recruitment 2021: UG, PG, MBA, PhD तरुणांसाठी बँकेत नोकरीची संधी, पटापट तपासा

| Updated on: Nov 23, 2021 | 6:00 AM

सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 115 पदांची भरती करेल. अशा परिस्थितीत ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, ते अधिकृत वेबसाईट centerbankofindia.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 23 नोव्हेंबरपासून सुरू होऊन 17 डिसेंबरपर्यंत चालेल. यानंतर अर्ज करण्याची नोंदणी विंडो बंद होईल.

Central Bank of India Recruitment 2021: UG, PG, MBA, PhD तरुणांसाठी बँकेत नोकरीची संधी, पटापट तपासा
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नवी दिल्लीः Central Bank of India SO Recruitment 2021: UG, PG, MBA, PhD तरुणांना बँकेत नोकरीची उत्तम संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने विविध पदांसाठी अर्ज मागवलेत. या अंतर्गत सुरक्षा अधिकारी, जोखीम व्यवस्थापक, आर्थिक विश्लेषक, क्रेडिट अधिकारी, अर्थशास्त्रज्ञ, डेटा सायंटिस्ट, तांत्रिक अधिकारी, कायदा अधिकारी, आयकर अधिकारी आणि इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 115 पदांची भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 115 पदांची भरती करेल. अशा परिस्थितीत ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, ते अधिकृत वेबसाईट centerbankofindia.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 23 नोव्हेंबरपासून सुरू होऊन 17 डिसेंबरपर्यंत चालेल. यानंतर अर्ज करण्याची नोंदणी विंडो बंद होईल.

Bank Recruitment 2021: या तारखा लक्षात ठेवा

ऑनलाईन अर्जाची तात्पुरती सुरुवात तारीख – 23 नोव्हेंबर 2021
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख -17 डिसेंबर 2021
CBI SO प्रवेशपत्राची तात्पुरती तारीख – 11 जानेवारी 2021
CBI SO परीक्षेची तारीख – 22 जानेवारी 2022

शैक्षणिक पात्रता

इकॉनॉमिस्टच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे बँकिंग/कॉमर्स/पब्लिक पॉलिसीसह इतर विषयांमध्ये पीएचडी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय व्यावसायिक बँकेत किमान 5 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
आयकर अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे चार्टर्ड अकाउंटन्सीची पदवी असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त पात्रता तसेच किमान 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
डेटा सायंटिस्टच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक शास्त्रात पीजी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराला 8 ते 10 वर्षांचा अनुभव असावा.
आर्थिक विश्लेषक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे वित्त विषयात CA/ICWA किंवा MBA असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव असावा. त्याच वेळी, विविध पदांवरील भरतीशी संबंधित अधिक पात्रता तपासण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

संबंधित बातम्या

‘या’ 4 चुकांमुळे PPF खाते बंद होऊ शकते, जमा पैशावर व्याज किंवा कर सूट नाहीच

काय सांगता! SBI ने खातेदारांकडून वसूल केलेले 164 कोटी अद्याप परत केलेच नाहीत