AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gen Z साठी नोकरीची मोठी संधी, ढगांकडे बघत बसायचं अन् महिन्याला घेयचा 8.5 लाख रुपये पगार

आरे बापरे! या देशात Gen Z साठी नोकरीची मोठी संधी. आरामात ढगांकडे बघत राहायचं अन् महिन्याला 8.5 लाख रुपये पगार घेयचा. नेमकं काय करायचं?

Gen Z साठी नोकरीची मोठी संधी, ढगांकडे बघत बसायचं अन् महिन्याला घेयचा 8.5 लाख रुपये पगार
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 08, 2026 | 6:58 PM
Share

नोकरी मिळवण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे चित्र जगभरात पाहायला मिळते. मात्र, चीनमध्ये सध्या एका अनोख्या नोकरीची चांगलीच चर्चा रंगली आहे. चीनच्या हेनान प्रांतातील प्रसिद्ध लाओजुन पर्वतावर ‘क्लाउड ऑब्झर्व्हर’ या पदासाठी भरती करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या एका पदासाठी तब्बल 3600 जणांनी अर्ज केला होता.

नोकरीची निवड प्रक्रिया देखील तितकीच अनोखी होती. उमेदवारांना चीनच्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Douyin वर ठरावीक हॅशटॅगसह स्वतःचा ओरिजिनल व्हिडिओ पोस्ट करण्यास सांगण्यात आले होते. ज्या उमेदवाराच्या व्हिडिओला सर्वाधिक लाइक्स, रीच आणि चांगली कंटेंट क्वालिटी मिळेल, त्याची या नोकरीसाठी निवड केली जाणार होती.

22 वर्षीय कंटेंट क्रिएटरची झाली निवड

या स्पर्धेत 22 वर्षीय कंटेंट क्रिएटर ली सिचेन याने बाजी मारली. सोशल मीडियावर तो ‘जिओ जाओ’ या नावाने ओळखला जातो. त्याने आपल्या आई-वडिलांसोबत रात्री लाओजुन पर्वतावर केलेल्या चढाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

या व्हिडिओला काही दिवसांतच तब्बल 1 लाख 10 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले. त्यामुळे ली सिचेनची 30 दिवसांच्या या अनोख्या नोकरीसाठी निवड झाली. 16 जुलैपासून त्याने समुद्रसपाटीपासून सुमारे 7217 फूट उंचीवर आपले काम सुरू केले.

नोकरी दिसते आरामाची, पण प्रत्यक्षात आहे खडतर!

पर्वतावर राहून ढगांचे निरीक्षण करणे आणि त्याचे व्हिडिओ बनवणे हे ऐकायला एखाद्या स्वप्नवत नोकरीसारखे वाटू शकते. मात्र, प्रत्यक्षात हे काम अत्यंत थकवणारे असल्याचे ली सिचेनने सांगितले आहे.

त्याच्या दिवसाची सुरुवात पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी होते. कॅमेरा घेऊन सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत त्याला पर्वतावरील ढग आणि निसर्गाचे चित्रीकरण करावे लागते. पाऊस असो किंवा कडक ऊन, दररोज किमान एक ओरिजिनल शॉर्ट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणे बंधनकारक आहे.

विशेष दृश्य टिपण्यासाठी कधी कधी त्याला तब्बल दोन तासांपर्यंत वाट पाहावी लागते. पर्वतावरील सतत बदलणारे तापमान, खराब मोबाईल नेटवर्क आणि एकटेपणा यामुळे हे काम आणखी आव्हानात्मक बनते. स्वतः ली सिचेनने हा अनुभव अत्यंत कठीण आणि काहीसा यातनादायक असल्याचे म्हटले आहे.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?