AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलवर धडाधड धाडी टाकणाऱ्या तुकाराम मुंढेंचं आवडतं स्ट्रीट फूड कोणतं? म्हणाले त्याची चटकच लागली

तुकाराम मुंढे यांच्याकडे एफडीए अर्थात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी कामाचा धडाका लावला आहे, दरम्यान त्यांना एका मुलाखतीमध्ये तुमचं आवडतं स्ट्रीट फूड कोणतं? असा प्रश्न विचारण्यात आला.

हॉटेलवर धडाधड धाडी टाकणाऱ्या तुकाराम मुंढेंचं आवडतं स्ट्रीट फूड कोणतं? म्हणाले त्याची चटकच लागली
tukaram mundheImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 08, 2026 | 7:06 PM
Share

तुकाराम मुंढे यांच्याकडे एफडीए अर्थात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी कामाचा झपाटा लावला आहे, राज्यात अनेक ठिकाणी एफडीएनं धाडी टाकल्या आहेत. अन्न पदार्थांमध्ये होणारी भेसळ उघड केली आहे. सध्या राज्यभरात तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक होत आहे. दरम्यान आज  ‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात  ‘भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ या उपक्रमांतर्गत ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. या मुलाखतीमध्ये त्यांना तुमचं आवडतं स्ट्रीट फूड कोणतं असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता.

नेमकं काय म्हणाले मुंढे?

मी कॉलेजला असताना पुणे विद्यापीठात चायनीज गाड्या असायच्या. पाषाण रोडला. मी विचार केला. तिथे जाऊन पाहावं का? माझं पहिलं चायनीज फूड मी तिथे खाल्लं. पण तोपर्यंत मला चायनीज फूड माहीत नव्हतं. आता भरपूर चायनीज फुडला डिमांड आहे. मी काही कारवाया केल्या. लोक म्हणतात आता चायनीज फूडवर कारवाई करा म्हणतात. आता पुढं लक्ष द्यायचं आहे.

आवडतं स्ट्रीट फूड असं म्हणणार नाही, आवडतं होतं. बऱ्याचदा कंडिशनमध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मी कॉलेजला असताना प्रॉपर जेवण मिळत नव्हतं. मेस लावू शकत नव्हतो. तेव्हा अशी व्यवस्था केली होती. संभाजी नगरला रस्त्यावर ऑम्लेट पॉवच्या गाड्या असतात. अप्सरा, आंबा टॉकीजच्या समोर ऑम्लेटच्या गाड्या लागायच्या. मला ऑम्लेट माहीत नसायचं. तिथे पहिल्यांदा खाल्लं. भावाने गाडीवाल्याला सांगितलं हा जेव्हा येईल तेव्हा ऑम्लेट द्या. मी पैसे देईन. त्यामुळे ऑम्लेट खायची चटक लागली.

त्यावेळी फरसाण आणि केळी खायचो. तेव्हा तो प्रकार फेमस होता. आता मी खाल्लं तर दोन तासात मी बोलू शकणार नाही. आता विचार करतो. तेव्हाचं तेल कसं असेल. त्यावेळी स्ट्रीट फूड आवडायचं. आता कोणतं आवडत नाही. विशेष म्हणजे दोन महिन्यापासून मी खात नाही, असं यावेळी मुंढे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?