AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CISF Recruitment 2021 : सीआयएसएफमध्ये 1200 पदांसाठी भरती, 21 ते 69 हजारांपर्यंत पगाराची संधी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) ने कॉन्स्टेबल/ फायरच्या पदावर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF Recruitment) वेबसाईटवर अर्ज करू शकतात.

CISF Recruitment 2021 : सीआयएसएफमध्ये 1200 पदांसाठी भरती, 21 ते 69 हजारांपर्यंत पगाराची संधी
job alertImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jan 29, 2022 | 2:05 PM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) ने कॉन्स्टेबल/ फायरच्या पदावर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF Recruitment) वेबसाईटवर अर्ज करू शकतात. 4 मार्च 2022 ही या अर्जासाठीची शेवटची तारिख असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 1149 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. खुल्या प्रवर्गात 489 पदं, ईडब्लूएस (EWS) 113, एससी 161, एसटी 137 आणि ओबीसी 249 जागासांठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी फक्त पुरुष उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 23 दरम्यान असणं आवश्यक आहे. उमेदवार बारावीला विज्ञान प्रवर्गातून उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

सीआयएसफतर्फे ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज स्वीकारले जातील. अन्य कोणत्याही मार्गानं अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा, ओएमआर पद्धतीनं बहूपर्यायी प्रश्न स्वरुपात घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार 700 ते 69 हजार रुपये पगार मिळेल. अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना डीसीपीएस पेन्शन सेवा लागू असेल.

अर्ज कुठे करायचा ?

स्टेप 1 : प्रथम सीआयएसफकडून जारी करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा स्टेप 2 : सीआयएसफच्या वेबसाईटला भेट द्या स्टेप 3 : www.csifrectt.in या वेबसाईटवर अर्ज दाकळ करा स्टेप 4 : ऑनलाईन अर्ज दाखल करा स्टेप 5 : फोटो सही आणि कागदपत्रं अपलोड करा आणि ऑनलाईन अर्ज सादर करुन त्याचं शुल्क जमा करा

अर्जाचं शुल्क

ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी एससी, एसटी आणि माजी सैनिक या प्रवर्गातील उमेदवार सोडून इतरांना 100 रुपये शुल्क भरावं लागणर आहे. यूपीआय किंवा डेबिट कार्ड द्वारे ते शुल्क जमा करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डाशी सलंग्नित महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केलं असाव. त्याचं वय 18 ते 23 दरम्यान असावं.

इतर बातम्या:

Funny Video : तीन चोरटे मिळून एक एलईडी टीव्हीही चोरू शकले नाहीत, CCTV कॅमेऱ्यात सर्व काही रेकॉर्ड

राऊतांचं झिंग झिंग झिंगाट फडणवीसांच्या भीतीमुळं! नव्या वाईन धोरणावर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल!

CISF invited application for 1200 constable fire post check details here

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.