AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CTET Admit Card ‘या’ तारखेला येणार, जाणून घ्या

CTET Admit Card 2024 Download: CTET डिसेंबर 2024 परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर परीक्षेचे CTET Admit Card जाहीर करू शकते.

CTET Admit Card ‘या’ तारखेला येणार, जाणून घ्या
परीक्षा वेळापत्रक
| Edited By: | Updated on: Nov 30, 2024 | 1:48 PM
Share

CTET Admit Card 2024 Download: लवकरच CTET परीक्षेचे Admit Card येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे CTET डिसेंबर 2024 परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी खास आहे. उमेदवार CTET डिसेंबर पेपर 1 आणि पेपर 2 Admit Card खाली दिलेल्या सोप्या पायऱ्यांद्वारे डाउनलोड करू शकता. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे Admit Card 7 ते 10 डिसेंबर दरम्यान जारी करू शकते. एका दिवसात परीक्षा शहर सूचना स्लिप प्रसिद्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Admit Card कसे डाउनलोड करावे?

Admit Card जारी झाल्यानंतर ते अधिकृत वेबसाईट ctet.nic.in वर उपलब्ध केले जाईल. उमेदवार येथे आपला नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि पासवर्ड टाकून Admit Card डाउनलोड करू शकतील.

CTET पेपर 1 आणि पेपर परीक्षा कधी होईल?

डिसेंबर सत्रातील CTET परीक्षा 14 डिसेंबर रोजी होणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी अडीच ते पाच या वेळेत होणार आहे. येथे अर्ज करणारे उमेदवार खाली दिलेल्या सोप्या चरणांद्वारे CTET डिसेंबर परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

CTET Admit Card 2024 कसे डाउनलोड करावे?

CTET च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. होमपेजवर जा आणि CTET डिसेंबर Admit Card 2024 डाउनलोड लिंकवर क्लिक करा. येथे आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करा. Admit Card 2024 तुमच्या स्क्रीनवर दिसेल. खाली डाउनलोड वर क्लिक करा आणि डेस्कटॉपवर सेव्ह करा.

मेल करून दुरुस्ती करा

तुमच्या Admit Card मध्ये नोंदणी क्रमांक, नाव, जन्मतारीख, फोटो किंवा इतर कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास ताबडतोब मेल करून दुरुस्त करून घ्या. ते ताबडतोब दुरुस्त करून तुम्हाला मेल केले जाईल.

शिक्षक होण्याची पात्रता काय?

CTET पेपर 1 हा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिकवण्यासाठी आहे. तर पेपर 2 इयत्ता सहावी ते आठवीसाठी आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवायचे असेल तर पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही परीक्षा देऊ शकता. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार सीबीएसई, केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयातील शिक्षक भरतीसाठी पात्र मानले जातात. CTET डिसेंबर परीक्षेचे Admit Card 2024 कसे डाउनलोड करायचे, याची सविस्तर माहिती आम्ही वर सांगितली आहे. आता तुम्ही जाहीर झालं की लगेच डाउनलोड करू शकता.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.