नवी दिल्ली: कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 10 वी आणि12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. ईएसआयसीमध्ये (ESIC Recruitment) 3600 पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ईएसआयीसीच्या विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. 3600 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जानेवारीपासून सुरु होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.