IMD Jobs : हवामान विभागात परीक्षेशिवाय नोकरीची संधी, सव्वा लाखांपर्यंत पगार मिळणार
Government Jobs : भारतीय हवामानशास्त्र विभागात नोकरीची संधी आहे. IMD ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. 24 नोव्हेंबरपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. 4 डिसेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागात नोकरीची संधी आहे. IMD ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. 24 नोव्हेंबरपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. लेखी परीक्षेशिवाय ही भरती पार पडणार आहे. या भरतीत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 29 हजार ते 1.23 लाखांपर्यंत पगार मिळणार आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती असेल आणि यासाछी शैक्षणिक पात्रता काय असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
4 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार
भारतीय हवामान विभागाने विविध पदांसाठी 24 नोव्हेंबरपासून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार 4 डिसेंबर 2025 पर्यंत IMD ची अधिकृत वेबसाइट https://mausam.imd.gov.in/ वर अर्ज करू शकतात. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरावी लागेल. त्यानंतर हा अर्ज सबमिट करावा लागेल. अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रियेची माहिती उमेदवारांना दिली जाणार आहे.
134 पदांसाठी भरती
भारतीय हवामान विभागाने एकूण 134 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यात प्रोजेक्ट सायंटिस्ट, सायंटिफिक असिस्टंट आणि अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट या पदांचा समावेश आहे. याठी पात्रता बी.टेक/बी.ई./एम.एससी./एम.ई./एम.टेक., बी.एससी. आणि बी.ए. अशी आहे. तसेच भौतिकशास्त्र/गणित/अंतराळशास्त्र किंवा वातावरणीय विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये किमान 60% गुण आवश्यक आहेत. य
वयोमर्यादा आणि पगार
विविध पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा असणार आहे. या सर्व पदांसाठी किमान 30 ते आणि कमाल 50 वर्षे वयोमर्यादा असणार आहे. यासाठी पदनिहाय वेतन दरमहा 29स200 ते 1,23,100 असे असणार आहे. या पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना एचआरएची देखील मिळणार आहे.
उमेदवारांची निवड कशी होणार ?
हवामान विभागाच्या या भरतीत 134 पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार आहे. सर्वप्रथम अर्ज शॉर्टलिस्ट केले जाणार आहेत. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल, मुलाखतीत मिळालेल्या मार्कांच्या आधारे मेरिटद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यांना सर्वप्रथम त्यांना ट्रेनिंग दिले जाईल आणि नंतर त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग केली जाणार आहे.
